12th Fail Movie News: विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित 12th फेल सिनेमावर सर्वांनी कौतुकाचा वर्षाव केलाय. आलिया भटपासून हृतिक रोशनपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना 12th फेल आवडलाय.
अशातच बिझनेसमन आनंद महिंद्रांनी 12th Fail पाहून सिनेमाचं कौतुक केलंय. काय म्हणाले आनंद महिंद्रा बघूया...
आनंद महिंद्रा यांनी 12th फेल सिनेमा पाहून ट्विट केलंय की, "गेल्या वीकेंडमध्ये मी अखेर '12th फेल' सिनेमा पाहिला. जर तुम्हाला २०२३ चा कोणताही एक सिनेमा बघायचा असेल तर तो फक्त हा एकच सिनेमा असेल."
का?
१) कथानक : ही कथा देशातील वास्तविक जीवनातील नायकांवर आधारित आहे. केवळ नायकच नाही तर लाखो तरुण, यशासाठी भुकेले आहेत, जे जगातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विलक्षण अडचणींविरुद्ध संघर्ष करतात.
२) अभिनय:
विधू विनोद चोप्रा यांनी कास्टिंगचे उत्कृष्ट काम केलंय. प्रत्येक पात्र भूमिकेत विश्वासार्ह आहे. विक्रांत मेस्सीने इतका उत्कृष्ट अभिनय केलाय की यंदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी त्याला पुरस्कार मिळणं निश्चित. तो केवळ पात्राची भूमिका साकारत नाही तर ती भूमिका जगतो.
३) कथनशैली: विधू चोप्रा आपल्याला आवर्जून आठवण करून देतात की महान सिनेमा हा उत्तम कथांवर आधारित असतो. आणि सिनेमात वापरलेले स्पेशल इफेक्ट्स चांगल्या प्रकारे सांगितलेल्या कथेच्या साधेपणा आणि सत्यतेशी जुळतात.
माझ्यासाठी मुख्य आकर्षण म्हणजे मुलाखतीचे दृश्य. होय, हे थोडेसे काल्पनिक वाटू शकते, परंतु सखोल संवादामुळे भारताने नवीन भारत निर्माण करण्यासाठी काय केले पाहिजे हे दाखवते. मिस्टर चोप्रा, ये दिल मांगे मोर फिल्मस यासारखे आणखी चित्रपट!
प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केल्यानंतर आता '12वी फेल'ने पुन्हा एक विक्रम आपल्या नावे केला आहे. या चित्रपटाला आता IMDbने 10 पैकी 9.2 रेटिंग दिले आहे.
या रेटिंगसह '12वी फेल' आता या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत टॉपवर आहे. या सिनेमाने केवळ भारतातच नाही तर जगभरातील चित्रपटांच्या यादित पहिलं स्थान मिळालं आहे.
भारतीय चित्रपटांच्या 250 चित्रपटांच्या यादीपैकी '12 वी फेल' हा IMDb वर सर्वाधिक रेट केलेला सिनेमा म्हणून ओळखला गेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.