Sonam Kapoor  file image
मनोरंजन

'त्याविरोधात बोलले तर मला काम मिळणार नाही'; सोनमचं मोठं विधान

"जर मी आवाज उठवला तर मला भूमिका मिळणार नाही."

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमध्ये आपल्या फॅशन सेन्समुळे आणि अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) तिची मतं बिनधास्तपणे नेहमीच मांडत असते. सोनमच्या वक्तव्यांचे काही जण सोशल मीडियावर कौतुक करतात, तर काही जण तिला ट्रोल करतात. काही दिवसांपूर्वी करीना कपूरने (kareena kapoor) सीता ही भूमिका साकारण्यासाठी तिचे मानधन वाढवल्याची चर्चा होती. त्यावेळी अभिनेत्री तापसी पन्नूने (taapsee pannu) करीनाची बाजू घेत बॉलिवूडमधील महिला आणि पुरूष यांच्या मानधनातील भेदावर भाष्य केले होते. नुकतेच एका मुलाखतीमध्ये सोनमने मानधनवाढीवर भाष्य केले आहे. (but then I do not get those roles Sonam Kapoor talk about pay disparity in Bollywood)

मुलाखतीमध्ये सोनम म्हणाली, 'या इंडस्ट्रीमध्ये अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मानधनातील अंतर हे हास्यास्पद आहे. मी याबद्दल बोलू शकते पण जर मी आवाज उठवला तर भूमिका मला मिळणार नाही. त्यामुळे माझ्यासाठी ही गोष्ट ठीक आहे. मला तसे करणे परवडणारे आहे. मला गेल्या दोन ते तीन वर्षात ही गोष्ट लक्षात आली आहे की, मला कोणाबद्दल मत बनवण्याचा अधिकार नाही. माझे वडील अभिनेते असल्यामुळे मला विशेषाधिकार प्राप्त झाले आहेत. त्यामुळे अवघड गोष्टींची निवड करणे हे माझ्यासाठी अवघड नाही.'

तापसीने बॉलिवूडमधील मानधनातील अंतरावर दिली होती प्रतिक्रिया

तापसी एका मुलाखतीमध्ये म्हणाली, 'एखादा अभिनेता जेव्हा अधिक पैसे मागतो तेव्हा त्याचं कौतुक केलं जातं. म्हणे त्याचा दर्जा आता वाढला आहे. पण एखाद्या अभिनेत्रीनं मानधन वाढवलं तर तिच्यावर टीका करतात. हा लिंगभेद आहे. अभिनेत्री देखील तितकीच मेहनत करतात हे विसरता कामा नये. काही लोकांचा अहंकार दुखावला गेलाय त्यामुळं ते टीका करतायेत. करीनानं मानधन वाढवून योग्यच केलं.' ती पुढे म्हणाली, 'महिलांनी मानधनाची रक्कम वाढवल्यावर आपण असं नेहमीच ऐकत असतो. पण का नाही? ती आपल्या देशातील महिला सुपरस्टार्सपैकी एक आहे. जर तिने जास्त मानधनाची मागणी केली आहे तर तिचे ते काम आहे. तुम्हाला असे वाटते का की पौराणिक कथेतील भूमिका साकारणारे पुरुष विनामूल्य काम करतात? मला तरी असे वाटत नाही.'

सुजॉय घोष यांच्या 'ब्लाइंड' या चित्रपटांमध्ये सोनम प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट कोरियन चित्रपटाचा रिमेक असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: चंदगड मतदारसंघात शिवाजी पाटीलआघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT