Canadian filmmaker Charles Officer dies at 48  SAKAL
मनोरंजन

Charles Officer: वयाच्या ४८ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेता - दिग्दर्शक चार्ल्स ऑफीसरचं दुःखद निधन

Devendra Jadhav

Charles Officer Passed Away News: प्रसिद्ध कॅनेडियन अभिनेता आणि चित्रपट निर्माता - दिग्दर्शक चार्ल्स ऑफिसरचे शुक्रवारी वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाले. त्याचा मित्र आणि बिझनेस पार्टनर जेक यानोव्स्की यांनी दीर्घ आजाराने चार्ल्स यांचं निधन झाल्याची दुःखद बातमी सांगितली

चार्ल्स हा असा चित्रपट निर्माता आणि अनोखा दिग्दर्शक होता जो कॅनडामधील वेगवेगळं जग मोठ्या पडद्यावर दाखवायचा. 'द पोर्टर' ही चार्ल्सने निर्मिती केलेली शेवटची कलाकृती होती. याआधी त्याने 12 कॅनेडियन स्क्रीन अवॉर्ड्स जिंकले. उत्कृष्ट दिग्दर्शनासह चार्ल्सला अनेक पुरस्कार मिळाले.

चार्ल्स ऑफिसरचा जन्म टोरंटोमध्ये ब्रिटीश वडील आणि जमैकन आईच्या पोटी झाला होता. तो शहराच्या पूर्वेकडील डॉन व्हॅली शेजारच्या भागात वाढला होता. त्याने 2008 मध्ये 'नर्स' या सिरीजचे दिग्दर्शन केले. याशिवाय 'फायटर' आणि 'बॉय टेक प्लेस' अशा सिरीजचे त्याने दिग्दर्शन केले.

कॅमेर्‍यामागे दिग्दर्शक म्हणुन करिअरची सुरुवात करण्याआधी त्याने सायकलींग क्षेत्र गाजवलं आहे. याशिवाय युरोपमध्ये प्रोफेशन हॉकी खेळण्यापासुन ते ग्राफीक डिझाईनपर्यंतच्या अनेक क्षेत्रात चार्ल्सने कामगिरी बजावली आहे.

न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध नेबरहुड प्लेहाऊस स्कूल ऑफ द थिएटरमध्ये त्याने अभिनय आणि फिल्ममेकिंगचे धडे गिरवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apple च्या आयफोन 16 सीरीजच्या विक्रीला सुरूवात, मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी रांग

Work Stress : अति ताणतणावाचा कर्मचाऱ्यांना धसका, मानसिकतेवर परिणाम; आयटी क्षेत्रात सर्वाधिक प्रमाण

China Open 2024 : मालविका बन्सोडचा पुन्हा धडाकेबाज विजय; चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश

Latest Marathi News Updates : आग्रा-दिल्ली रेल्वे मार्गावर ट्रॅक कोसळला; 42 गाड्यांचे बदलले मार्ग

IIFL Finance: आरबीआयने IIFL फायनान्सला दिला मोठा दिलासा; गोल्ड लोन व्यवसायावरील बंदी मागे, कंपनीच्या शेअर्सवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT