Celina Jaitly takes legal action against Pakistan journalist for defaming her Esakal
मनोरंजन

Celina Jaitley Controversy: 'तू तर बाप-लेकासोबतच...', पाकिस्तानी समीक्षकाला सेलिनावर केलेलं वक्तव्य पडलं महागात, प्रकरण थेट परराष्ट्र मंत्रालयात

Vaishali Patil

Celina Jaitley Controversy Fardeen Khan Father: बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटी सेलिना जेटली ही मनोरंजन विश्वापासून दूर असली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपुर्वी एका पाकिस्तानी समीक्षकांने तिच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन आरोप केल्यानं सेलिनाचा चांगलाच भडका उडाला होता. त्यावेळी तिने टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं.

पाकिस्तानी समिक्षक आणि पत्रकार याने सेलिना जेटलीचे फरदीन खान आणि त्याचे वडील फिरोज खान यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सेलिनानं ट्विट करून त्याला चोख प्रत्युत्तर दिले. त्यातच सेलिनाने या याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालय आणि महिला आयोगाला पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती.

त्यानंतर आता सेलिनाचं हे प्रकरण आता भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि महिला आयोगापर्यंत पोहोचलं. तिच्या या मागणीनंतर आता परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणी कारवाई केली.

या प्रकरणी आता परराष्ट्र मंत्रालयाने हा मुद्दा पाकिस्तानी उच्चायुक्तांकडे उचलून धरला आणि चौकशीची मागणी केली असल्याची माहिती सेलिनाने दिली आहे.

सेलिनाने ट्विटरवर एका लांबलचक नोट लिहिली आणि त्यासोबत परराष्ट्र मंत्रालयाने राष्ट्रीय महिला आयोगाला पाठवलेल्या पत्राचे फोटोही शेयर केले आहे.

(Celina Jaitly takes legal action against Pakistan journalist for defaming her case now in foreign ministry)

सेलिनाने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानमधील चित्रपट समीक्षक उमेर संधूने माझ्याबद्दल खोटा आरोप केलं होते.

खरं तर, उमेर संधू स्वतःला चित्रपट समीक्षक म्हणवतो आणि ट्विटरवर भारतीय सेलिब्रिटींबद्दल आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणारे दावे करत असतो.

पाकिस्तानकडून त्याच्या खोट्या दाव्यांवरची माझी प्रतिक्रिया व्हायरल झाली आणि लाखो चाहत्यांचा मला पाठिंबा मिळाला ज्यात पाकिस्तानी लोकांचा समावेश आहे.

यातच तिने सेलीनाने सांगितलं की, फिरोज खान हे तिचे गुरू होते आणि फरदीन खानसोबत तिचे चांगले नाते होते. अशा आरोपांमुळे ती खूप दु:खी झाली आहे. सेलिना NCW चे देखील या पोस्टमध्ये आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT