BFC CEO Post:  Esakal
मनोरंजन

CBFC CEO Post: लाचखोरी प्रकरणानंतर रवींद्र भाकर यांची सेन्सॉर बोर्डाच्या सीईओ पदावरून हकालपट्टी?

Vaishali Patil

गेल्या काही महिन्यांपासून सेन्सॉर बोर्ड वादात सापडला आहे. ऑक्टोबरमध्ये तमिळ अभिनेता विशालने सेन्सॉर बोर्डावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.

यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपवण्यात आला होता. आता या प्रकरणी तपास सुरु झाला असून सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र भाकर यांना पदावरून हटविण्यात आले आहे.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने त्यांना सीईओ पद सोडण्यास सांगितले. त्यांना पुन्हा त्यांच्या पूर्वीच्या पदावर परत जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, रवींद्र यांना या पदावरून अचानक हटवण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीत.

काही दिवसांपुर्वी सेन्सॉर बोर्डावर लाचखोरीचा आरोप झाला होता. तमिळ अभिनेता विशालने हा आरोप केला होता. चित्रपट पास करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना 6.5 लाख रुपये द्यावे लागले असं त्याने आरोपात सांगितलं होतं.

इतकच नाही तर हे आरोप करत त्यांने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत कारवाई करण्याचे आवाहन केले होते.

त्यानंतर, या प्रकरणी गुन्हा नोंदवून CBI ने CBFC चे काही अधिकारी आणि इतर तिघांविरुद्ध तपास सुरू केला होता. आता रवींद्र भाकर यांच्यावर झालेली कारवाई याच प्रकरणी असू शकते असा अंदाज लावला जात आहे.

या प्रकरणी सीबीआयने मर्लिन मैंगा, मेहुणा रामदास आणि राजूत अशी इतर तीन जणांची ओळख पटवली आहे. तर सीबीएफसी कर्मचाऱ्यांच्या नावांबाबत कोणताही खुलासा झालेला नाही. आता रवींद्र भाटकर यांना हटवण्यामागे या प्रकरणाचा संबंध आहे की वेगळे काही कारण आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रवींद्र भाकर यांनी रेल्वे विभागात पाठवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संभाजी छत्रपतींचा ताफा मुंबईत अडवला, गाडीवर चढून भाषण! म्हणाले, "पटेलांचा पुतळा झाला पण..."

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर Sachin Tendulkar ची लक्ष्यवेधी पोस्ट

Dussehra Fashoin Tips: यंदा महानवमी अन् दसऱ्याला 'या' पद्धतीने करा तयारी, सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

रहस्यामुळे खिळवून ठेवणारा थरारपट

SCROLL FOR NEXT