मुंबई - बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींनी यापूर्वी सेन्सॉर बोर्डाच्या नियमांवर आक्षेप घेतले होते. त्यात दिग्दर्शकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर होता. चित्रपट अथवा मालिका यात दाखविण्यात आलेल्या आशयाला कात्री न देता त्याकडे दिग्दर्शकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून पाहिले जावे असा तो मुद्दा होता. मात्र त्यावर ठोस कार्यवाही काही झाली नाही. आता सेन्सॉर बोर्डानं नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यात ज्या भाषेत चित्रपट तयार केला गेला त्याच भाषेत नावे (क्रेडिट्स) द्यावे लागणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून हिंदी असो वा इतर कुठल्याही भाषेतील चित्रपट त्यातील नावे ही सरसकट इंग्रजीमध्ये असत. यापुढील काळात तसे होणार नाही. बोर्डानं सांगितलेल्या नव्या नियमानुसार निर्माते आणि दिग्दर्शक यांना ती श्रेय नामावली ज्या भाषेत चित्रपट प्रदर्शित झाला आहे त्याच भाषेत द्यावी लागणार आहे. ते बंधनकारक असणार आहे. सेन्सॉर बोर्डानं असे सांगितले आहे की, हिंदी सकट सर्व भाषांमधील चित्रपटांमधील नावे इंग्रजीत देण्याचा एक प्रघात सुरु होता. तो काही दिवसांत वाढल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा : तोकडे कपडे घालून पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याचं प्रकरण; प्रियांकाने आता मांडली तिची बाजू
सीबीएफसी (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) ने सर्व निर्मात्यांना असे सांगितले आहे की, चित्रपटाचे नाव, कलाकारांचे नाव, आणि इतर चित्रपटाशी संबंधित श्रेय नामावली ही ज्या भाषेत चित्रपट आहे त्याच भाषेत द्यावी लागणार आहे. बोर्डाकडून दिग्दर्शक आणि निर्माते यांना ज्या भाषेत प्रमाणपत्र दिले आहे त्याचे नियम लक्षात घ्यावे लागणार आहे. हिंदी आणि क्षेत्रीय भाषेतील चित्रपटांसाठी हा महत्वाचा नियम असल्याचे सांगितले जात आहे.
सीबीएफसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र भाकर यांनी सांगितले की, नव्या नियमाविषयी एक निवेदन प्रसिध्द करण्यात आले आहे. १९८३ च्या नियम २२ नुसार अधिसुचना जाहीर करण्यात येते की, चित्रपटाचे नाव, कलाकारांचे नाव, क्रेडिट्स हे ज्या भाषेत चित्रपटाचे चित्रिकरण झाले आहे त्या भाषेत द्यावे लागणार आहे. ज्या भाषेशिवाय इतर भाषेचा उपयोग त्याला करता येणार आहे. अशी सूचना भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालय च्या अंतर्गत असणा-या सीबीएफसी फिल्म प्रमाणपत्र बोर्डाकडून करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.