Central Railway has declared that Passengers can watch movie in Railway Station dombivli khopoli  SAKAL
मनोरंजन

Mumbai Local: आता रेल्वे स्थानकातच घ्या चित्रपट पाहण्याचा आनंद, रेल्वेकडून प्रवाशांसाठी खुशखबर

मध्य रेल्वेकडून प्रवाशांना सिनेमा पाहण्यासाठी खास सोय करण्यात येणार आहे

Devendra Jadhav

भारतीय रेल्वेने महसूल वाढविण्यासाठी न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम आणली आहे. या योजनेतंर्गत अनेक सुविधा रेल्वे स्थानकांवर सुरू करण्यात आले आहे. आता मध्य रेल्वेने

मुंबई विभागाच्या काही स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत. या सुविधेमुळे प्रवाशांना स्थानकाच चित्रपट पाहता येणार आहे.

(Central Railway has declared that Passengers can watch movie in Railway Station dombivli khopoli)

स्थानकातच प्रवाशांना विविध आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यावर रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्थानकात सिने डोम उभारण्याचा निर्णय़ घेतला आहे. सिने डोम हा ग्राहक/अभ्यागत/पाहुण्यांसाठी जेवण/नाश्ता/पेय्यांसह नवीनतम चित्रपट प्रदर्शित आणि माहितीपट आणि इतर सामग्री इ.सह चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी एक संपूर्ण व्यवस्था असणार आहे. मात्र, कायमस्वरूपी बांधकाम करण्यास परवानगी दिली जाणार नाही. सिने डोमचे व्यवस्थापन निविदाकार स्वतःच ऑपरेटर करतील. गर्दीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी परवानाधारकाची असणार आहे. दहा वर्षांच्या कालावधीसाठी डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम सेट अप आणि ऑपरेट करण्यासाठी ते नॉन-फेअर रेव्हेन्यू (NFR) उत्पन्न मॉडेल अंतर्गत असेल.स्थानकात पाच हजार चौरस फूट जागेत डोमची निर्मिती होणार आहे.

प्रतिवर्षी राखीव किंमत

१) डोंबिवली -४७,८५,४००रु

२) जुचंद्र - ३५,८२,०००रु

३) इगतपुरी – १७,१०,४००रु

४) खोपोली - २३,३१,१००रु

रेल्वेला मिळणार महसूल -

भारतीय रेल्वेत महसूल वाढविण्यासाठी काही वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम (एनआयएनएफआरआयएस) आणली आहे. यामार्फत महसूल वाढविण्यासाठी अनेक योजना राबवणे सुरु केले आहे. यातील अनेक योजना यशस्वी झाल्या आहे तर,आता प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम ही सुविधेला प्रवाशांची किती पसंती मिळेल की नाही ही तर येणारी वेळ कळेल.

कोट-

रेल्वेने प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याला आमचा विरोध नाही. परंतु, फक्त योजना आणून चालणार नाही तर या योजना यशस्वी करणे महत्वाचे आहे. याशिवाय प्रवाशांच्या मूलभूत सुविधेकडे ही रेल्वेने लक्ष द्यायला हवेत.

- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT