Chahat Pandey On Joining Politics: 
मनोरंजन

Chahat Pandey: राजकारणासाठी अभिनय क्षेत्र सोडणार का चाहत? 'या' पक्षाकडून लढवणार निवडणूक!

Vaishali Patil

Chahat Pandey On Joining Politics: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री चाहत पांडे ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चाहतने 'दुर्गा: माता की छाया', 'हमरी बहू सिल्क' या मालिकेतून घरघरात ओळख मिळवली आहे. सध्या चाहत 'नथ जेवर या जंजीर' या मालिकेत अभिनय करत आहे.

आता नुकत्याच पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत चाहतने तिला अभिनय सोडून राजकारणात का यायचं आहे याबाबत खुलासा केला आहे.

अभिनयाव्यतरिक्त चाहत राजकारणातही सक्रिय आहे. ती आता राजकारणात येण्यासाठी अभिनय क्षेत्रातुन ब्रेक घेणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आगामी निवडणुकांमुळे चाहत आता या मालिकेत दिसणार नाही.


याबाबत चाहत म्हणते की, " मी आता माझ्या राजकीय कारकिर्दीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे. मी आगामी निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून मध्य प्रदेशातील दमोह येथून आमदारपदासाठी निवडणुक लढवणार आहे. पण यासाठी मी माझे अभिनय क्षेत्र सोडणार नाही. मी दोन्ही क्षेत्र साभांळण्याचा प्रयत्न करेल. तरी मी काही काळ ब्रेकवर असणार आहे. "

तर चाहतने राजकारण या क्षेत्रात येण्याचे का ठरवले असं जेव्हा तिला विचारलं गेलं तर ती म्हणाली की, चाहतने राजकारणी व्हावं अशी तिच्या आईची नेहमीपासूनच ती इच्छा होती. त्याचबरोबर तिला राजकारणात रस होताच त्यामुळे तिने हा निर्णय घेतला.

आता तिला या क्षेत्रात येऊन सहा महीने झाले आहे. आता चाहत राजकारणात आपलं करियर बनवू शकते की नाही याकडे सर्वांच्या नजरा आहेत मात्र तिचे चाहते तिचं कौतुक करत आहेत. तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे.

चाहत पांडेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने 2016 मध्ये 'पवित्र बंधन' या मालिकेद्वारे आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. ती 'राधाकृष्ण' मालिकेत राधाच्या भूमिकेत दिसली. त्यानंतर तिने2019 मध्ये 'हमरी बहू सिल्क'मध्ये दिसली. त्यानंतर चाहतने 'दुर्गा माता की छाया' आणि 'नथ जेवर या जंजीर' या मालिकांमध्ये काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Viral Video: सर्फराजची कॅचवरून विराट कोहलीने उडवली खिल्ली; ऋषभ पंत तर हसून लोटपोट झाला

Assembly Election 2024 : एसटी बस निवडणूक कर्तव्यावर... प्रवासी स्टॅण्डवर, सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचा खोळंबा

Pune Crime : प्रेमसंबंधास नकार; समाज माध्यमावर अश्लील छायाचित्रे टाकून मित्राकडून तरुणीची बदनामी

Fact Check: सकाळ माध्यमाच्या नावे व्हायरल होत असलेली 'सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाचा दावा' ही पोस्ट खोटी

आई झालेल्या दीपिका पादुकोणची उडवली खिल्ली; मग लिहिली त्याहून वाईट कमेंट, नेटकऱ्यांचा संताप अनावर

SCROLL FOR NEXT