Chandramukhi 2 trailer Kangana Ranaut looks stunning  esakal
मनोरंजन

Chandramukhi 2 Trailer : 'तुम्ही कुणीही चुकूनही दक्षिणेकडच्या दरवाजाकडे जाऊ नका, तिकडं....', 'चंद्रमुखी २' चा ट्रेलर भलताच भयानक

युगंधर ताजणे

Chandramukhi 2 trailer Kangana Ranaut looks stunning : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगनाच्या ज्या चित्रपटाची चाहत्यांना कमालीची उत्सुकता होती त्या चंद्रमुखी २ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रमुखी २ वरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.

पहिल्यांदा तमिळ मग तेलुगू आणि नंतर हिंदी भाषेतील ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. २००५ मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर चंद्रमुखी या चित्रपटाचा सिक्वेल म्हणून चंद्रमुखी २ कडे पाहिले जात आहे. त्याचे दिग्दर्शन पी वासू यांनी केले होते. चंद्रमुखी २ मध्ये कंगना राणावत मुख्य भूमिकेत असून तिच्यासोबत राघव लॉरेन्स दिसणार आहे.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत तरतुदी जाणून घ्या

बहुचर्चित अशा चंद्रमुखी २ चा ट्रेलर येताच त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. हॉरर, सस्पेन्स या प्रकारातील चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. कंगनानं चंद्रमुखी मध्ये एका नर्तिकेची भूमिका केली असून तो राघव लॉरेन्सनं राजा वेट्टीयान राजाची भूमिका साकारली आहे.

यापूर्वी कंगनानं एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, चंद्रमुखी २ मध्ये पुन्हा ती भूमिका साकारणं खरचं अवघड होते. या भूमीकेतून खूप काही शिकायला मिळाले. इतक्या वर्षांनी पुन्हा त्याच भूमिकेत जाणे ती भूमिका जिवंत करणे आव्हानात्मक होते. मात्र त्यात चांगले काम करता आले याचे समाधान आहे.

चंद्रमुखी २ हा येत्या १५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून तो पॅन इंडिया प्रोजेक्ट आहे. तो तमिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती मेकर्सनं दिली आहे. यापूर्वी तमिळ भाषेतील चंद्रमुखीमध्ये रजनीकांत आणि ज्योतिका यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PESA Bhart : आदिवासी आमदारांच्या आंदोलनाला यश! पेसा कायद्यातली पदे भरण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Updates : मोदीजींच बंजारा समाजाशी विशिष्ट नातं- देवेंद्र फडणवीस

'त्यांची नियत नीट नव्हती, म्हणून त्यांच्या हातून अनावरण झालेला पुतळा कोसळला'; राहुल गांधींचा भाजपला सणसणीत टोला

Mahindra Thar Roxx : ‘थार रॉक्स’ला मिळतोय अभूतपूर्व प्रतिसाद; एका तासात विक्रमी १ लाख ७६ हजार गाड्यांची नोंदणी

कमला हॅरिस, तुलसी गॅबार्ड अन् उषा व्हान्स.. अमेरिकन राजकारणात भारतीयांचे वाढले महत्व

SCROLL FOR NEXT