Celebs Reaction On Chandrayaan 3 Landing: भारताने अंतराळात इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान -3 ने सॉफ्ट लँडिंग केली. चंद्रावर चांद्रयान-3 चे यशस्वी सॉफ्ट लँडिंग ऐतिहासिक आहे. भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान ३ मोहिमेच्या यशानंतर देशभरात भारताच्या वैज्ञानिकांचं आणि भारतीयांचं अभिनंदन होत आहे .
चांद्रयान 3 च्या यशावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया देत इस्रोचे अभिनंदन केले आहे. याबाबत बॉलिवूड सेलिब्रिटीनीही सोशल मीडियावर पोस्ट टाकून आनंद आणि उत्साह व्यक्त केला आहे.
बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर यांनी देखील पोस्ट शेयर करत लिहिले, "भारतीय अंतराळ तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे नेत्रदीपक प्रदर्शन! सर्व देशवासियांचे अभिनंदन!
तर बॉलिवूड अभिनेता आर माधवनने आपला आनंद आणि उत्साह व्यक्त केला आणि लिहिले- 'जय जय जय हिंद ...'
अभिनेता कार्तिक आर्यनने देखील इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आणि लिहिले की, 'आमचा भारत चंद्रावर आहे.. हा ऐतिहासिक क्षण !!'
अनुपम खेर यांनी देखील त्याच्या ऑफिसमध्ये हा क्षण पाहिला. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये लिहिले आहे, 'देशातील नागरिकांनो भारत चंद्रावर !!! जय हिंद!'
'कोट्यवधी हृदय इस्रोचं आभार मानत आहेत.. तुम्ही आम्हाला अभिमानी बनवलं आहे.... भारताला इतिहास घडवताना पाहून भाग्यवान वाटत आहे... भारत चंद्रावर आहे.... आम्ही चंद्रावर आहोत'. अशा शब्दात अक्षय कुमारने सोशल मीडियाच्या पोस्ट शेयर करत आनंद व्यक्त केला.
विकी कौशलनेही देशाच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करताना इस्रोचे अभिनंदन केले आहे. विकीने लिहिले- 'इस्रोच्या टीमचे अभिनंदन... आम्हाला अभिमानी वाटल्याबद्दल धन्यवाद...'
त्याचबरोबर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानेही इस्रोचे आभार मानत पोस्टमध्ये लिहिले की, 'चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल इस्रोचे अभिनंदन... प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. जय हिंद.'
अभिनेत्री श्रद्धा कपूरने इस्रोच्या प्रमुखांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यासोबत तिने लिहिले- 'व्वा... काय क्षण आहे.'
एक व्हिडिओ शेअर करत रवीना टंडनने लिहिले, “ लँड हो गया, इंडिया चांद पर” अभिनेत्री स्नेहाने लिहिले, “आम्ही चंद्रावर उतरलो आहोत. जय हिंद"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.