charchaughi marathi natak come back after 31 years directed by chandrakant kulkarni cast mukta barve rohini hattangadi kadambari naik parn pethe  sakal
मनोरंजन

चौकट भेदणारं 'चारचौघी' नाटक ३१ वर्षानंतर पुन्हा रंगभूमीवर..

नीलेश अडसूळ

ChaarChoughi : बाई पणाची चौकट भेदून स्त्रियांची मुक्तता, स्वातंत्र्य आणि बंडखोरपणा यावर निर्भीड भाष्य करणारे एक वादळी नाटक १९९१ रोजी रंगभूमीवर आले. प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'चारचौघी' या नाटकाने त्यावेळी मोठा इतिहास रचला. हे नाटक काळाच्या इतके पुढचे होते की अनेकांनी त्यावर टीका देखील केली. पण विचारवंतांनी मात्र हे नाटक अक्षरशः डोक्यावर घेतले. नाट्यरसिकांसाठी हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे. जवळपास ३१ वर्षांनी हे नाटक पुन्हा एकदा सज्ज झाले आहे.

(charchaughi marathi natak come back after 31 years directed by chandrakant kulkarni cast mukta barve rohini hattangadi kadambari naik parn pethe)

करोना काळात नाटकावर आलेलं संकट दूर होऊन नाटकाची गाडी आता कुठे रुळावर आली आहे. अनेक नव्या नाट्यकृती रंगभूमीवर येत आहेत. त्यातच एका महत्वाच्या नाटकाची घोषणा करण्यात आली. ३१ वर्षांपूर्वी ज्या नाटकाने इतिहास घडवला होता असे 'चारचौघी' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'चारचौघी' या नाटकात रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे, पार्थ केतकर आणि मुक्ता बर्वे असे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'जिगीषा'ने या नाट्य संस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे. तर प्रशांत दळवीने या नाटकाचे लेखक आहेत. अशोक पत्की यांनी या नाटकाचं संगीत केलं असून संदेश बेंद्रे यांनी नेपथ्याची धुरा सांभाळली आहे.

15 ऑगस्ट 1991 रोजी 'चारचौघी' हे नाटक रंगभूमीवर आले होते. आता हे नाटक नव्या संचात पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रशांत दळवी यांनी लिहिलेल्या 'चारचौघी' या नाटकात 31 वर्षांपूर्वी वंदना गुप्ते, आसावरी जोशी, प्रतीक्षा लोणकर आणि दीपा श्रीराम यांच्या या नाटकात मुख्य भूमिका होत्या. स्त्रियांची मतं, त्यांचे निर्णय याबद्दल सखोल दर्शन घडवणारं 'चारचौघी' हे नाटक त्याकाळी खूप गाजलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंनी तब्बल चार मिनटं लालबागच्या राजाच्या पायावर ठेवलं डोकं; बाप्पाकडं नेमकं काय मागितलं?

मुख्यमंत्रीपदाबाबत भाजप प्रदेशाध्यक्षांचं मोठं विधान; बावनकुळे म्हणाले, 'सध्या शिंदे CM आहेत, आमच्यात मुख्यमंत्री होण्यासाठी...'

महाआघाडीत असतानाही आम्ही कधी मैत्रीपूर्ण लढती केलेल्या नाहीत; मैत्रीपूर्ण लढतीला काहीच अर्थ नाही - अजित पवार

Latur Crime : ११२ क्रमांक डायल करून पोलिसांची दिशाभूल ; एकावर गुन्हा दाखल

Pune Crime News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने डॉक्टरची सव्वा कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT