Charlie Chaplin's daughter Josephine Chaplin dead at 74 in paris SAKAL
मनोरंजन

Josephine Chaplin: चार्ली चॅप्लिनची मुलगी जोसेफिन चॅप्लिनचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

चार्ली चॅप्लिनची मुलगी आणि अभिनेत्री जोसेफिन चॅप्लिन हिचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे

Devendra Jadhav

Josephine Chaplin Death News: दिग्गज कॉमेडी कलाकार चार्ली चॅप्लिन आज या जगात नसला तरीही त्याचे सिनेमे लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने पाहतात. चार्ली चॅप्लिनच्या कुटूंबातुन एक मोठी बातमी समोर येतेय.

चार्ली चॅप्लिनची मुलगी आणि अभिनेत्री जोसेफिन चॅप्लिन हिचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे. व्हरायटी मिडीयानुसार, 13 जुलै रोजी पॅरिसमध्ये जोसेफिन चॅप्लिनचा मृत्यू झाला.

(Charlie Chaplin's daughter Josephine Chaplin dead at 74)

बाबा चार्ली चॅप्लिनसोबत केलेली अभिनय कारकीर्दीला सुरुवात

जोसेफिनने तिचे वडिल चार्ली चॅप्लिनच्या पावलावर पाऊल टाकले आणि स्वतःची अभिनय कारकीर्द सुरू केली. ती तिच्या वडिलांसोबत "लाइमलाइट" सिनेमात अगदी लहान वयात सुद्धा दिसली होती, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः चॅप्लिन यांनी केले होते.

अभिनेत्री जोसेफिनने 1967 मध्ये "अ काउंटेस फ्रॉम हाँगकाँग" या चॅप्लिन चित्रपटात काम केले. याशिवाय "द मॅन विदाऊट अ फेस" आणि "शॅडोमन" अशा सिनेमांमध्ये जोसेफिन झळकली आहे.

जगभरातल्या फॅन्सकडून श्रद्धांजली

जोसेफिनने 1969 मध्ये ग्रीक व्यावसायिक निक्की सिस्टोवारीसशी लग्न केले. पुढे 1977 मध्ये या जोडीचा घटस्फोट झाला. तिने 1989 मध्ये तिचे दुसरे पती, पुरातत्वशास्त्रज्ञ जीन-क्लॉड गार्डिन यांच्याशी लग्न केले. 2013 मध्ये तिचे दुसरे पती गार्डिनचं निधन झालं.

जोसेफिनने वडील चार्ली चॅप्लिन यांच्या अभिनयाचा समृद्ध वारसा तिच्या परीने पुढे चालु ठेवला. चार्ली चॅप्लिनच्या कुटूंबाबद्दल कायमच लोकांना सहानुभुती आणि प्रेम वाटलंय. जोसेफिनच्या निधनानंतर तिला जगभरातल्या फॅन्सनी श्रद्धांजली वाहिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: संजू सॅमसनची Century! ट्वेंटी-२०त विराट-रोहितच काय, तर एकाही भारतीयाला नाही जमलाय हा विक्रम

Assembly Election 2024 : पालघर जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का; कुणबी सेनेचा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा

Champions Trophy 2025 : BCCI पाकिस्तानात न जाण्यावर ठाम; PCB म्हणते लेखी द्या, मग बघतोच...! IND vs PAK यांच्यात 'वॉर' जोरदार

SA vs IND T20I: अन् सूर्याच्या टीम इंडियानं राष्ट्रगीताचा अपमान होऊ दिला नाही; साऊंड बंद झाला, पण...

Trending News: अरे ये कैसा हुआ रे बाबा ! नवरा-बायकोचं भांडण अन् रेल्वेला लागला तीन कोटींचा चुना

SCROLL FOR NEXT