अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या Sushant Singh Rajput निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. १४ जून २०२० रोजी मुंबईतल्या राहत्या घरी त्याचा मृतदेह आढळला. त्यापूर्वी सुशांत बॉलिवूडच्या काही प्रोजेक्ट्सवर काम करत होता. दिग्दर्शक रुमी जाफरी Rumi Jaffery यांनी त्यांच्या एका चित्रपटात सुशांतला मुख्य भूमिकेची ऑफर दिली होती. हा चित्रपट गेल्या वर्षी लॉकडाउननंतर प्रदर्शित होणार होता. यामध्ये सुशांतची कथित गर्लफ्रेंड व अभिनेत्री रिया चक्रवर्ती Rhea Chakraborty त्याच्यासोबत मुख्य भूमिका साकारणार होती. आता रुमी जाफरी यांचा 'चेहरे' हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. यामध्ये रिया महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रुमी यांनी रियाविषयी आपलं मत मांडलं.
काय म्हणाले रुमी जाफरी?
"चेहरे हा चित्रपट गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार होता आणि त्यानंतर मे महिन्यात मी सुशांतसोबत शूटिंगला सुरुवात करणार होतो. सुशांतसोबत काम करण्याची इच्छा अनेक निर्मात्यांनी व्यक्त केली होती. सुशांत त्याचे प्रोजेक्ट्स खूप विचारपूर्वक निवडतो, हे इंडस्ट्रीत सर्वांना माहित आहे. त्यामुळे त्याने माझ्या चित्रपटाला होकार दिला, म्हणजे काहीतरी खास गोष्ट नक्की असणार असं निर्मात्यांना वाटलं. त्या दृष्टीने मी आणि सुशांतने कामाला सुरुवात केली होती. मुख्य अभिनेता म्हणून सुशांतचा चेहरा डोळ्यांसमोर ठेवून मी स्क्रीप्ट लिहित होतो. आता जेव्हा कधी मला ती स्क्रिप्ट दिसते, तेव्हा मला सुशांतचाच चेहरा दिसतो. त्यामुळे आता मी ती स्क्रिप्ट काही दिवसांसाठी लॉकरमध्ये ठेवून दिली आहे. काही दिवसांनंतर त्या स्क्रिप्टबाबतचा योग्य निर्णय मी घेईन. पण सध्या तरी मी त्यावर काहीच काम करू शकणार नाही", असं ते 'न्यूज १८'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
रुमी जाफरी दिग्दर्शित 'चेहरे' हा चित्रपट येत्या २७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर एनसीबीने ड्रग्जच्या अँगलने तपास सुरू केला. यादरम्यान रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. सुशांतच्या चाहत्यांनी तिच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियाद्वारे केली होती. या सर्व वादानंतर रिया पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मीडिया ट्रायलनंतर आता अनेकजण रियाच्या बाजूने आहेत, असं जाफरी पुढे म्हणाले. "रियाने चित्रपटात अत्यंत दमदार भूमिका साकारली आहे. त्यामुळे वादाच्या माझ्या चित्रपटावर परिणाम होईल असं मला वाटत नाही. सध्या माध्यमांचाही दृष्टीकोन बदलला आहे. गेल्या वर्षी अनेकजण रियाला बरंवाईट सुनावत होते आणि आता वर्षभरानंतर तिला सर्वांत आकर्षक महिलेचा पुरस्कार देण्यात आला. आता विनाकारण तिला लोक ट्रोल करत नाहीत", असं रुमी म्हणाले. 'चेहरे' या चित्रपटात अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.