'स्कूप' या वेबसिरीजची गेल्या कही दिवसांपासून खुप चर्तेत आहे. या सिरिजबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वाद विवादही सुरु आहे.
दरम्यान आता तुरुंगात बंद असलेला माफिया गँगस्टर राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन याने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात 'स्कूप' या वेबसिरीजच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची याचिका दाखल केली.
राजन सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. त्याला एक रुपया नुकसानभरपाई द्यावी, इतकच नाही तर या सिरिजमधुन मिळणारी कमाई समाजाच्या भल्यासाठी खर्च करण्याचे निर्देश द्यावेत, असे याचिकेत म्हटले आहे.
या याचिकेवर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. याचिकेत राजन यांनी मालिकेच्या प्रदर्शनावर स्थगिती आणि ट्रेलर मागे घेण्याच्या निर्देशाची मागणी केली आहे.
राजन यांनी याचिकेत दावा केला आहे की, त्यांच्या संमतीशिवाय वेब सीरिजमध्ये त्यांची व्यक्तिरेखा दाखवता येणार नाही.
असे झाल्यास ते त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकाराचे उल्लंघन ठरेल आणि मानहानीकारकही ठरेल. ही वेब सिरीज २ जून रोजी नेटफ्लिक्सवर दिसणार आहे.
काय म्हणाला छोटा राजन?
राजन सध्या तिहार तुरुंगात आहे. मालिकेच्या प्रदर्शनावर बंदी घालावी आणि ट्रेलर काढून टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली.
त्याने हंसल मेहता आणि नेटफ्लिक्स एंटरटेनमेंट सर्व्हिसेस इंडियासह सिरिजच्या निर्मात्यांना त्याच्या वैयक्तिक अधिकारांचे उल्लंघन करण्यापासून रोखण्यासाठी मनाई आदेशाची मागणी केली.
राजनने त्याला 1 रुपये भरपाईची किंवा मालिकेच्या ट्रेलरच्या टेलिकास्टद्वारे निर्मात्यांनी कमावलेले पैसे 'जनहितासाठी किंवा समाजाच्या उन्नतीसाठी' वापरण्याची मागणी केली. न्यायालयात शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
हंसल मेहता यांची नवीन वेब सीरिज 'स्कूप'चा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला आहे. करिश्मा तन्ना या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाचं कथानक आधारित आहे ते २०११ मध्ये पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येच्या केसवर, ज्यामध्ये पत्रकार जिग्ना वोराला आरोपी म्हणून ताब्यात घेतलं होतं.
स्कूप ट्रेलरची सुरुवात एका फोन कॉलने होते. बोललं जातं की जागृति पाठकसाठी कुणा नानाचा फोन आहे,दुबईहून. नाना म्हणजे छोटा राजन... नेटफ्लिक्सवर ही सिरिज प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.