Chinmay Mandlekar shared post about hemant dhome and sunny marathi movie cast release date  sakal
मनोरंजन

Chinmay Mandlekar: ह्यांना काय कळतं रे? म्हणत चिन्मय मांडलेकरने सांगितला ऐतिहासिक क्षण

अभिनेता चिन्मय मांडलेकरची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

नीलेश अडसूळ

chinmay mandlekar: नाटक, मालिका, चित्रपट, वेब मालिका अशा चारही माध्यमात लीलया वावरणारा मराठतील एक दिग्गज मानाला जाणारा अभिनेता म्हणजे चिन्मय मांडलेकर(Chinmay Mandlekar). तो कायमच महत्वाचे विषय घेऊन प्रेक्षकांसमोर येतो. 'काश्मीर फाईल्स' मधील त्याचे दहशतवाद्याचे काम असतो की 'पावनखिंड'मधील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका. त्याच्या प्रत्येक कामातून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आज त्याने एक पोस्ट करत एका ऐतिहासिक क्षणाची कबुली दिली आहे.

चिन्मय मांडलेकर आता एका आमदाराची भूमिका साकारणार आहे. हेमंत धोमे दिग्दर्शित 'सनी' या चित्रपटात चिन्मय महत्वाच्या भूमिकेत असून आज हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याच निमित्ताने चिन्मयने एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट दिग्दर्शक हेमंत ढोमेला उद्देशून पोस्ट केली आहे.

चिन्मयने लिहिले आहे की, "ह्यांना काय कळतं रे? मी सांगतो तेवढंच कर". असा दृष्टांत माननीय दिग्दर्शक हेमंतजी ढोमे यांनी मला दिला, तोच हा ऐतिहासिक क्षण. मी तेच आणि तेवढंच केलंय. आज पासून सर्वत्र प्रदर्शित झालाय 'सनी'. नक्की बघा. 

'सनी' या चित्रपटात विश्वजित मोहिते पाटील या कार्यसम्राट आमदाराची व्यक्तिरेखा चिन्मयने साकारली आहे. विश्वजित आणि सनीमध्ये यांच्यामध्ये दुरावा आहे, तो नेमका का आणि कशासाठी आहे ते चित्रपट पाहिल्यावर कळेलच. पान करारी, मुत्सद्दी आणि तितकीच मिश्किल अशी ही भूमिका आहे.

क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी' हा सिनेमा आज १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. इरावती कर्णिक लिखित या चित्रपटात ‘सनी’ची भूमिका ललित प्रभाकरने साकारली आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते असून संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पारा घसरला; आजपासून थंडीचा जोर वाढणार

Rahul Gandhi : मोदींचा डोळा राज्याच्या संपत्तीवर...राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

SCROLL FOR NEXT