chinmay mandlekar, the kashmir files, zee cine awards 2023 SAKAL
मनोरंजन

The Kashmir Files मधल्या भूमिकेसाठी पुरस्कार स्वीकारताना Chinmay Mandlekar च्या 'त्या' कृतीने सर्वांचं मन जिंकलं

चिन्मयने काश्मीर फाईल्स मध्ये फारूक मलिक बिट्टाची भूमिका साकारली होती

Devendra Jadhav

The Kashmir Files News: द काश्मीर फाईल्स मधल्या खलनायक भूमिकेसाठी अभिनेता चिन्मय मांडलेकरचा मोठा सन्मान करण्यात आलाय. चिन्मयने काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) मध्ये फारूक मलिक बिट्टाची भूमिका साकारली होती.

चिन्मयने (Chinmay Mandlekar ) प्रथमच क्रूरपणा गाठणारी मोठी खलनायकी भूमिका साकारली होती. चिन्मयने साकारलेला बिट्टा सर्वांच्या उरात धडकी भरवून गेला. याच भूमिकेसाठी चिन्मयचा मोठा सन्मान करण्यात आलाय.

(chinmay mandlekar won Zee Cine Award in the category of Best Actor in Negative Role, for the film The Kashmir Files)

द काश्मीर फाईल्स मधल्या भूमिकेसाठी चिन्मय मांडलेकरला झी सिनेमा अवॉर्ड्स पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट निगेटिव्ह रोल म्हणून गौरवण्यात आलंय.

चिन्मयने सोशल मीडियावर झी सिने अवॉर्ड्स मध्ये पुरस्कार स्वीकारतानाचा व्हिडिओ पोस्ट केलाय. ज्येष्ठ अभिनेते गुलशन ग्रोव्हर, सनी देओल आणि अभिनेता बॉबी देओलच्या हस्ते चिन्मयला हा पुरस्कार देण्यात आला.

चिन्मयने सोशल मीडियावर पुरस्कार स्वीकारतानाचा व्हिडिओ पोस्ट करून सर्वांचे आभार मानणारी पोस्ट शेयर केलीय. चिन्मय लिहितो.. यासाठी कृतज्ञता हा एकमेव शब्द आहे.

द काश्मीर फाइल्स या चित्रपटासाठी नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून झी सिने पुरस्कार जिंकला. अशी पोस्ट चिन्मयने सोशल मीडियावर केलीय. याशिवाय हा बॉलिवूड पुरस्कार स्वीकारताना चिन्मयने मराठीत सर्वांचे आभार मानले महाराष्ट्राची मनं जिंकली आहेत

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या 'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir Files) या सिनेमाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.

या सिनेमातलं सत्य पाहून कुणाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या असतील तर सत्याचं खरं रुप पाहून रागाचा पारा चढलाही असेल तर कुणाच्या मनात भावनांचा कल्लोळही माजला असेल. 'द काश्मिर फाईल्स' सिनेमात काही दृश्य हैराण करतात तर काही दृश्य पाहताना त्रासही होतो.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मिर फाईल्स हा चित्रपट 11 मार्च २०२२ ला प्रदर्शित झाला होता. सिनेमात चिन्मय मांडलेकर सोबत अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती असे दिग्गज कलाकार होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT