Chiranjeevi Ramcharan Movie story: बॉलीवूड भारी की टॉलीवूड असा प्रश्न नेहमीच चाहते, नेटकरी विचारत असतात. सध्याच्या घडीला त्याचे उत्तर टॉलीवूडनं आपल्या चित्रपटांमधून दिलं आहे. त्यांचे कलाकार, चित्रपटाची कथा, गाणी, संवाद हे सारेच प्रेक्षकांना प्रभावित करणारे आहेत. गेल्या वर्षापासून टॉलीवूडचे नशीब जोरावर असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या प्रदर्शित झालेल्या बऱ्याचशा चित्रपटांना बॉलीवूडच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. आता चर्चा आहे. चिरंजीवी आणि त्यांचा मुलगा रामचरणच्या आचार्य चित्रपटाची.
बॉलीवूडचे स्टार अभिनेते यांचे मानधन घेण्याची पद्धत जरा वेगळीच आहे. ते चित्रपटांमध्ये भागीदारी घेणं पसंद करतात. बॉक्स ऑफिसवर तो किती चालतो त्याच्या उत्पन्नातील ठराविक टक्केवारी ही त्या कलाकारांच्या खिशात जाते. यात उरलेल्या कलाकारांना, तंत्रज्ञांना, आणि क्रु मेंबर्सला किती पैसै मिळतात याच्याशी त्यांना काही देणे घेणे नसते. याला अपवाद मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा आहे. तो चित्रपट चालला नाही तर त्या चित्रपटाचे मानधन घेत नाही. असे त्यानं जाहीर मुलाखतीमध्ये सांगितले होते.
आता टॉलीवूडच्या स्टार बाप लेकांची एक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे त्यांनी त्यांच्या आचार्य या चित्रपटासाठी घेतलेली फी निर्मात्यांना परत केली आहे. त्याचे कारण म्हणजे तो चित्रपट फ्लॉप झाला. त्याला म्हणावा असा प्रेक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला आहे. हिंदूस्थान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार त्यांनी आचार्यला मिळालेला कमी प्रतिसाद लक्षात घेता या चित्रपटासाठी मानधनाचा जो आकडा सांगितला होता त्यातील 80 टक्के मानधन परत केले आहे.
याविषयी बोलताना चिरंजीवी म्हणाले की, आम्ही आमच्या मानधनातील काही भाग परत दिला याबद्दल आम्हाला जराही खेद नाही. याउलट चित्रपट फ्लॉप का झाला याचा विचार करणे जास्त महत्वाचे वाटते. अर्थात मानधनाबाबत कोणी काय निर्णय घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी आम्हाला काय वाटते हा विचार करुन हे पाऊल उचलले असल्याचे चिरंजीवी यांनी म्हटले आहे. तेलुगू फिल्म आचार्यचे दिग्दर्शन कोरटाला सिवा यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.