Chitra wagh- Urfi javed  Esakal
मनोरंजन

Execlusive: 'जर कारवाई झाली तर..'. चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेनंतर उर्फीची पहिली प्रतिक्रिया..

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत उर्फी जावेदवर कारवाईची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघींमध्ये ट्वीटर वॉर रंगलं होतं.

प्रणाली मोरे

Urfi Javed: गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात खडाजंगी सुरू आहे. हा वाद काही थांबायचं नाव घेताना दिसत नाही. चित्रा वाघ यांच्या आपल्या विरोधातील ट्वीटला उत्तर देताना उर्फीनं मोठीच उडी घेतली होती. दोघींमध्ये ट्वीटर वॉर रंगलेलं दिसून आलं. चित्रा वाघ यांनी ट्वीटरचा वाद तिथेच न सोडता थेट मुंबई पोलिस आयुक्तांकडे उर्फी विरोधात निवेदन दिलं होतं. (Urfi Javed Reaction Chitra Wagh Press Conference)

चित्रा वाघ यांच्या आपल्या विरोधातील या सगळ्या हालचालींना विरोधा दर्शवत उर्फीनं अनेक शाब्दिक वार चित्रा वाघ यांच्यावर केले. चित्रा वाघ या राजकीय व्यक्तिमत्त्व असूनही न घाबरता उर्फीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या विरोधात बोलत पोस्ट केली होती. त्यात तिनं आपल्या मनातील भीती देखील बोलून दाखवली होती.

पण हेच बोलताना चित्रा वाघ यांची खिल्ली उडवायलाही तिनं मागेपुढे पाहिलं नाहीय आपण जे करतोय ते करत राहणार,कुणालाही घाबरणार नाही..असं म्हणताना उर्फीनं राजकीय नेत्यांशी पंगा म्हणजे जीवाची भीती पण शांत राहण्यापेक्षा मनात येईल ते बोललं आणि मग या राजकीय लोकांच्या हातून मरण आलं तर बेहत्तर असं देखील मत उर्फीनं त्या पोस्टमध्ये मांडलं होतं.

उर्फीच्या या आगाऊ धाडसाला उत्तर देताना आज चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी उर्फी विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. ही मागणी करताना त्यांनी दाखला दिला तो तेजस्विनी पंडीतच्या 'अनुराधा' या वेबसिरीजच्या पोस्टरचा. या पोस्टरवर धु्म्रपान करताना बोल्ड अंदाजात दिसलेल्या तेजस्विनी पंडीत विरोधात तेव्हा महिला आयोगानं अॅक्शन घेतली होती. तेजस्विनीला नोटीसही पाठवण्यात आली होती.

या घटनेचा दाखला देत चित्रा वाघ यांनी मागणी केली आहे की,जर एका पोस्टरवरनं कारवाई केली जाऊ शकते तर उर्फी जावेद मुंबईच्या रस्त्यावर नंगा नाच करतेय...मग तिच्यावर अद्याप कारवाई का नाही होत आहे. ती कारवाई झालीच पाहिजे. व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली जो स्वैराचार सुरू आहे तो थांबला पाहिजे.

चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेतील कारवाईच्या मागणी संदर्भात उर्फी जावेदचं मत जाणून घेण्यासाठी ईसकाळनं थेट तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आधी तर आपल्याला जे बोलायचे आहे ते आपण बोललो आहोत असं तिच्या प्रवक्त्यानं सांगितलं. आणि जर कारवाई करण्याची मागणी होत असेल तर आपणही योग्य ती पावलं उचलू आणि याची माहिती मीडियाला दिली जाईल असं उर्फी जावेदच्या प्रवक्त्यानं स्पष्ट सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT