पुणे: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदिपक ‘चित्रकर्मी’ पुरस्कार नुकताच बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. या सोहळ्यात पुण्यातील चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कलाकार व तंत्रज्ञांना हा पुरस्कार देवून त्यांनी दिलेल्या चित्रपटसृष्टीच्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करून गौरविण्यात आले. यावेळी झगमगती विद्युत रोषणाई आणि नृत्याविष्काराने हा चित्रकर्मी पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावली होती.
या वेळी एकूण १७ चित्रकर्मी पुरस्कार या वेळी प्रदान करण्यात आले. चित्रपट विभागात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलाकार तंत्रज्ञ यांचा सन्मान केला. यात निर्माता- सुभाष परदेशी, दिग्दर्शक - कांचन नायक, लेखक – श्रीनिवास भणगे, छायाचित्रण – चारुदत्त दुखंडे, संगीत – प्रभाकर जोग, कला – शाम भूतकर, रंगभूषा – विक्रम गायकवाड, अभिनेता – राहुल सोलापूरकर, अभिनेत्री – ललिता देसाई, नृत्य – नंदकिशोर कपोते, संकलन – गिरीष ओक, चित्रपटगृह – अरविंद चाफळकर, चित्रपटगृह – प्रकाश चाफळकर, निर्मिती व्यवस्था – शेखर सोमण, प्रकाश योजना – यशवंत भुवड, चित्रपट समिक्षा – अरुणा अंतरकर, वेशभूषा – दत्ता भणगे, कामगार – राम पायगुडे या सन्माननियांना सन्मानचिन्ह, १० हजार रुपयांचा धनादेश, एक पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप होते. याजसोबत या व्यक्तींना आयुष्यभर साथ करणाऱ्या त्यांच्या पत्नी चाही सन्मान पैठणी देऊन सत्कार करण्यात आला. अभिनेते मनोज जोशी, दिग्दर्शक राजेश मापुस्कर, सुचित्रा भावे या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांचा विशेष सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
यावेळी अभिनेत्री वर्षा उसगावकर, पूजा पवार, तेजस्विनी लोणारी, सुरेखा कुडची, रेश्मा परितेकर, नेहा सोनावणे, गिरीजा प्रभू, सुवर्णा काळे, आयली गिया, अमित कल्याणकर, मयूर लोणकर अशा अनेक कलाकारांनी बहारदार नृत्य सादर केले. त्याच बरोबर शिवराज वाळवेकर, संग्राम सरदेशमुख, मिलिंद शिंत्रे, चैत्राली डोंगरे, राहुल बेलापूरकर अशा विनोद वीरांनी स्किट्स आणि विनोदी ढंगात सादर केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास फुटाणे, ज्योती चांदेकर, सुहासिनी देशपांडे, जयमाला इनामदार, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले महामंडळाचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत शेलार, शर्वरी जेमनीस, पुष्कर शोत्री, योगेश सुपेकर, संतोष चोरडिया, अथर्व कर्वे आदींनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.