Thanglaan Esakal
मनोरंजन

Thanglaan: साउथस्टार विक्रमचा बर्थडे मग विषयच हार्ड! 'थंगालन' चा धमाकेदार टिझरसह फर्स्ट लूक रिलिज...KGF पेक्षाही खतरनाक

Vaishali Patil

Thangalaan: आज साऊथ स्टार चियान विक्रम त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने निर्मात्यांनी विक्रमच्या चाहत्यांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे.

निर्मात्यांनी त्यांच्या आगामी 'थंगालन' चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. हा टिझर रिलिज होताच सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

थंगालन हा चित्रपट केजीएफच्या सत्यकथेवर आधारित असेल. यात चियान विक्रम केजीएफमध्ये काम करणाऱ्या गावकऱ्याची भूमिका साकारली आहे.

यावेळी निर्मात्यांनी पोस्टरसह, निर्मात्यांनी 'थंगालन' च्या शूटचा एक BTS व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विक्रमला ओळखणे खूप अवघड आहे.

विक्रमचा लूक एकदम रॉ आणि रफ दिसत आहे. टीझरमध्ये पाहिल्यानंतर त्याला ओळखनही कठिण असेल. त्याचे लांब केस आणि मोठी दाढी त्याचा लूक हा अधिक भयानक दिसत आहे. टीझरच्या मागे दिसणारा बीजीएम अप्रतिम आहे.

चियान विक्रम आणि थंगलान ट्विटरवर ट्रेंड करत आहे आणि चाहत्यांनी त्याला डोक्यावर घेतल आहे. 'थंगालन'च्या निर्मात्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अॅक्शन सीनसाठी कशी तयारी करण्यात आली होती हे दाखवण्यात आले आहे. विक्रम थंगालनच्या भूमिकेसाठी तयार होऊन शूटिंग करत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे.

'थंगालन' च्या कथेबद्दल बोलायचं झालं तर KGF म्हणजेच कोलार गोल्ड फील्ड्समध्ये घडलेल्या वास्तविक घटनांवर ही कथा आधारित आहे. 'थंगालन'मध्ये मालविका मोहनन, पार्वती मेनन, हरी कृष्णन, अन्वु दुराई आणि पशुपतीसह अनेक कलाकार दिसणार आहेत.

रिपोर्ट्सनुसार, थंगालन हा विक्रमच्या कारकिर्दीतील सर्वात महागडा चित्रपट आहे. 'थंगालन'चे बजेट जवळपास 150 कोटी रुपये आहे आणि तो तमिळ व्यतिरिक्त हिंदी आणि इतर भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट 2023 मध्येच रिलीज होणार आहे, परंतु अद्याप तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Result: अजितदादांचा आनंद द्विगणित! पुण्यातील आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? 'या' तीन नावांची चर्चा

IND vs AUS : Yashasvi Jaiswal च्या दीडशतकी खेळीने रचला नवा विक्रम ; दिग्गजांमध्ये स्थान मिळवणारा पहिला भारतीय

Adampur Firing : भरदिवसा दोन टोळ्यांमध्ये गोळीबारचा थरार; एकमेकांवर झाडल्या गोळ्या, आदमापुरात नेमकं काय घडलं?

Girish Mahajan : गिरीश महाजन ठरले पुन्हा संकट मोचक; बंडखोरी थोपविण्यात यश

Nashik East Assembly Constituency : बालेकिल्ला शाबूत, ढिकलेच ‘पहिलवान’

SCROLL FOR NEXT