Choi Sung Bong Death News: 2011 मध्ये कोरियाज गॉट टॅलेंटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आलेला कोरियन गायिका चोई सुंग-बोंगचे निधन झालेय. तो 33 वर्षांचा होता.
हॉलिवूड रिपोर्टरच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सकाळी (20 जून) दक्षिण कोरियाच्या दक्षिणेकडील सोलमधील येओक्सम-डोंग जिल्ह्यातील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केलेल्या अवस्थेत चोई सुंग-बोंग आढळला.
(Choi Sung-Bong ‘Korea’s Got Talent’ Star Dead at 33)
कोरिया टाईम्सच्या वृत्तानुसार, 33 वर्षीय सुंग-बोंग मंगळवारी सकाळी 9.41 वाजता सोलच्या येओक्सम-डोंग जिल्ह्यातील त्याच्या घरी पोलिसांना मृतावस्थेत आढळला. बुधवारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने आत्महत्या केली.
त्याच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या एका नोटमध्ये लिहिले आहे, "माझ्या मूर्ख चुकीमुळे ज्यांना त्रास झाला आहे त्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो." याशिवाय त्याला मिळालेल्या सर्व देणग्या त्याने परत केल्या आहेत.
2011 मध्ये कोरिया गॉट टॅलेंटमध्ये उपविजेतेपदाचे पारितोषिक जिंकल्यानंतर गायक सुंग-बोंगने लोकांचे लक्ष वेधून घेतले. परंतु 2021 मध्ये, त्याने खोटा दावा केला की तो अनेक कर्करोगांशी लढत आहे.
यानंतर, त्याला प्रायोजकत्वात मोठी रक्कम मिळाली. नंतर, सुंग-बोंगने आपल्या चुकीची कबुली दिली आणि त्याला मिळालेल्या देणग्या परत करण्याचे आश्वासन दिले.
कोरिया गॉट टॅलेंटमध्ये, त्याने स्वतःची ओळख एक मेहनती कामगार म्हणून करून दिली, जो दहा वर्षे गम आणि एनर्जी ड्रिंक्स विकून उदरनिर्वाह करत होता.
त्याची कामगिरी क्लिप YouTube वर पोस्ट केली गेली आणि त्याला जस्टिन बीबर, जंग-ह्वा उम अशा लोकप्रिय पॉप स्टारकडून प्रशंसा मिळाली.
त्याच्या मृत्यूपर्यंत, त्याने बोंगबोंग कंपनीशी करार केला होता. एक चांगला गायक आपल्यातुन गेला म्हणुन हळहळ व्यक्त केली जातेय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.