Chris Hemsworth wish to work with Ram Charan : भारताला ऑस्कर मिळवून देण्याता आरआरआरचे नाव घ्यावे लागेल. या चित्रपटातील नाटू नाटू हे गाणं कमालीचं लोकप्रिय झालं होतं.
त्याला सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी ऑस्करही मिळाला. यासगळ्यात आरआऱआरचे दिग्दर्शक एस एस राजामौली आणि त्या चित्रपटातील रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर चर्चेत आले होते.
हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ जो अॅव्हेंजरमध्ये थॉरच्या भूमिकेत होता त्याची क्रेझ जगभर आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. काही वर्षांपूर्वी त्याचा एक्स्ट्रॅक्शन नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
नेटफ्लि्क्सवर आलेल्या या चित्रपटानं नेटकऱ्यांना जिंकून घेतले होते. या महिन्यात त्याच्या एक्स्ट्रॅक्शन नावाच्या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Also Read - Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे
ख्रिसनं आता आपल्याला बॉलीवूडच्या चित्रपटांची भुरळ पडल्याचे सांगितले आहे. त्यात त्याला राजामौली यांच्या आऱआऱआऱ चित्रपटानं प्रभावित केल्याचे म्हटले आहे.
त्यामुळेच की काय त्याला त्या चित्रपटातील दोन मुख्य कलाकार ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांच्यासोबत काम करायची इच्छा आहे. त्यानं एका कार्यक्रमामध्ये त्याविषयी बोलून दाखवले आहे.
तीन वर्षांपूर्वी ख्रिसचा एक्स्ट्रॅक्शन नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात बॉलीवूडचा रणदीप हुडाही दिसला होता. सॅम हारग्रेव्ह नावाच्या दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा दुसरा भाग जूनच्या १६ तारखेला प्रदर्शित होतो आहे. चाहते गेल्या तीन वर्षांपासून या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टची वाट पाहत होते.
ख्रिसनं जेव्हा आरआऱआऱ पाहिला तेव्हा तो एनटीआऱ आणि रामचरणच्या प्रेमात पडला. त्यानं राजामौली यांना फोन करुन त्यांचे कौतूकही केले. आणि मला त्यांच्या पुढच्या चित्रपटात घ्यावे अशी विनंतीही केली आहे.
काही दिवसांपूर्वी ख्रिसनं न्युज १८ शी संवाद साधला. त्यात त्यानं आपल्याला ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ख्रिसची ती मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी देखील त्याचं कौतूक केलं आहे.
रामचरण आणि एनटीआर यांनी ज्याप्रकारे अभिनय केला आहे त्याला तोड नाही. मला त्यांच्यासोबत एखाद्या चित्रपटामध्ये काम करायला आवडेल. अशी प्रतिक्रियाही त्यानं दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.