chrisann pereira Esakal
मनोरंजन

Chrisann Pereira:'टॉयलेटच्या पाण्याची कॉफी अन् कपडे धुण्याच्या पावडरने..', क्रिसन परेराचा शारजा जेलविषयी खळबळजनक खुलासा

प्रणाली मोरे

Chrisann Pereira: काही दिवसांपूर्वी बातमी होती की बॉलीवूड अभिनेत्री क्रिसन परेरा हिला ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी अटक करुन अमीरातच्या शारजा सेंट्रल जेलमध्ये बंदी बनवून ठेवलं होतं. पण आता तिला जेलमधून सोडण्यात आल्याची बातमी समोर आल्यानं तिच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. क्रिसन परेरानं आता एक लेटर लिहित जेलमध्ये तिला मिळालेल्या वागणुकीविषयी मोठा खुलासा केला आहे.

बॉलीवूडमधनं पुन्हा एक ड्रग्ज प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. सिनेमा आणि वेबसीरिजमध्ये दिसलेली अभिनेत्री क्रिसन परेरा हिच्यावर ड्रग्ज तस्करीचा आरोप केला गेला होता आणि दुबईत त्याप्रकरणात तिला अटक करण्यात आली होती.

त्यानंतर बातमी समोर आली की अभिनेत्रीला या प्रकरणात फसवलं गेलं होतं. क्रिसन परेराला मुंबईच्या एका व्यावसायिकानं या जाळ्यात अडकवलं होतं. आता अभिनेत्रीची जेलमधून सुटका झाली आहे.

तसंच,अभिनेत्रीचं एक लेटर देखील समोर आलं आहे,ज्यामध्ये तिनं जेलमधील तिच्या वाईट दिवसांवर भाष्य केलं आहे. क्रिसननं लिहिलं आहे की, ''तिला जेलमध्ये खूप अडचणींचा सामना करावा लागला''.(chrisann pereira: Wash hair with tide,made coffee from toilet water. chrisann pereira recountws her prison life in sharjah)

अमीरातच्या शारजा सेंट्रल जेलमध्ये कैदी म्हणून राहिलेल्या क्रिसन परेराची आता सुटका झाली आहे. ती लवकरच भारतात पोहचण्याची आशा आहे. तिनं आता एका लेटरच्या माध्यमातून जेलमधील तिच्यासोबतच्या वाईट वागणुकीचा पाढा वाचला आहे. या लेटरला तिचा भाई केविननं इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. या लेटरमध्ये क्रिसनने लिहिलं आहे की,''२६ दिवस जेलमध्ये राहिले मी. त्यादरम्यान मी कपडे धुवायच्या पावडरनं माझ्या केसांना धुतलं. तर टॉयलेटसाठी वापरणाऱ्या पाण्यानं कॉफी बनवली''.

तिनं लेटरमध्ये पुढे लिहिलं की,''मी बॉलीवूड सिनेमे पाहिले,कधी-कधी मी खूप रडायचे. मला एक भारतीय असण्याचा आणि भारतीय फिल्म इंडस्ट्रीशी मी जोडलेली आहे याचा अभिमान आहे''.

''माझ्या कठीण प्रसंगात मला साथ देणारं माझं कुटुंब आणि मित्र परिवार यांचे आभार मानत क्रिसन पुढे म्हणाली,तुम्ही खरे योद्धा आहात,आणि मी या राक्षसांनी खेळलेल्या गलिच्छ खेळातील एक मोहरा आहे. मी ट्वीट करत मला पाठिंबा देणाऱ्या अनेकांची आभारी आहे. माझ्यासारखंच जे या घोटाळ्यात फसले होते त्या सगळ्या निर्दोष लोकांची सुटका केल्यासाठी धन्यवाद. नेहमी सत्याचा विजय होवो''.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT