CID 'Freddy' Dinesh Phadnis on ventilator due to heart attect in mumbai SAKAL
मनोरंजन

Dinesh Phadnis: CID मधील 'फ्रेडी' फेम अभिनेता दिनेश फडणीस व्हेंटिलेटरवर; तब्येत नाजूक

Devendra Jadhav

Dinesh Phadnis News: सी.आय.डी. या लोकप्रिय मालिकेत फ्रेडरिक उर्फ 'फ्रेडी'ची भूमिका साकारणारा अभिनेता दिनेश फडणीसची प्रकृती खालावली असल्याची बातमी समोर येतेय.

दिनेशची प्रकृती चिंताजनक असताना त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. सविस्तर बातमी बघूया..

News 24 च्या मीडिया रिपोर्ट्सवर, 'फ्रेडरिक' म्हणजेच दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचं वय ५७ वर्षांचं आहे. अचानक ही बातमी समोर आल्याने फ्रेडरिक यांच्या चाहत्यांना आणि सी.आय.डीच्या कलाकारांना जबर धक्का बसलाय.

दिनेश फडणीस जीवन-मरणाशी झुंज देत आहेत. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश फडणीस व्हेंटिलेटरवर असून जीवन-मरणाशी झुंज देत आहेत. रिपोर्ट्सनुसार, सीआयडीचे संपूर्ण कलाकार आणि क्रूला काल रात्री त्यांच्या तब्येतीची माहिती मिळाली, त्यानंतर अनेकांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

कोण आहेत दिनेश फडणीस?

दिनेश फडणीस यांनी CID मध्ये 'फ्रेडरिक्स' उर्फ ​​फ्रेडी या नावाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. दिनेशने 'सरफरोश', 'मेला' आदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांनी 20 वर्षे टीव्ही शो सीआयडीमध्ये फ्रेडीची भूमिका साकारली होती.

शोमधील त्यांची फनी स्टाइल सर्वांनाच आवडली. इतकंच नाही तर सीआयडी व्यतिरिक्त दिनेशने अदालत, सीआयडी स्पेशल ब्युरो, तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकांमध्येही अभिनय केलाय.

दिनेश हे आजारपणातुन ठणठणीत बरे व्हावेत म्हणुन चाहते प्रार्थना करत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

Jammu Kashmir Exit Poll Result: हरियाणानंतर जम्मू-काश्मीरमध्येही भाजपला धक्का; काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज? वाचा सविस्तर...

मेट्रोच्या Aarey To BKC Aqua Line भुयारी सेवेला आजपासून सुरूवात, कसं असेल भाडं आणि वेळापत्रक, जाणून घ्या...

Haryana Exit Poll Result: 10 वर्षांचा दुष्काळ संपणार! हरियाणात काँग्रेसचं सरकार? पाहा एक्झिट पोलचा अंदाज...

Sports Bulletin 5th Oct 2024 : मुंबईने २७ वर्षांनी जिंकला इराणी चषक ते भारतीय महिला संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमी फायनलचे समीकरण, एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT