circuitt marathi movie new song kahisa out sung by sonu nigam cast Hruta Durgule vaibhav tatwawadi sakal
मनोरंजन

Hruta Durgule: हृताचा भलताच रोमँटिक अंदाज.. 'काहीसा बावरतो' गाण्यात दिसतेय लय गोड..

अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या 'सर्किट' चित्रपटाचे नवे रोमँटिक गाणे प्रदर्शित..

नीलेश अडसूळ

hruta durgule new song kahisa: अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या बरीच चर्चेत आहे. कारण 'अनन्या' नंतर आता तिचा "सर्किट" हा दमदार चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटाची सध्या मराठीत बरीच चर्चा आहे.

अशातच या चित्रपटातलं रोमँटिक गाणं नुकतंच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. "काहीसा बावरतो, काहीसा सावरतो...." असे हलकेफुलके शब्द असलेलं हे गाणं सोनू निगम यांनी गायलं असून, वैभव आणि हृता यांची छान केमिस्ट्री या गाण्यात पहायला मिळते आहे.

(circuitt marathi movie new song kahisa out sung by sonu nigam cast Hruta Durgule vaibhav tatwawadi)

आजवर अनेक कारणांनी चर्चेत असलेला "सर्किट" हा चित्रपट ७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भांडारकर एंटरटेनमेंट आणि पराग मेहता प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनच्या पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली आहे.

स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर, विकास पवार तर फिनिक्स प्रॉडक्शनचे अल्पेश गेहलोत, कीर्ति पेंढारकर, आकाश त्रिवेदी, मनोज जैन, मोहित लालवाणी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे.

आनंद पेंढारकर, जितेंद्र जोशी यांचे गीतलेखन, अभिजीत कवठाळकर यांचे सुमधुर संगीत दिग्दर्शन, संजय जमखंडी यांनी रुपांतरित कथा आणि संवाद लेखन, शब्बीर नाईक यांनी छायांकन तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.

"सर्किट" या चित्रपटाच्या टीझरपासूनच चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. अत्यंत उत्कंठावर्धक कथानक या चित्रपटात असल्याचं टीझरवरून दिसतं. आता चित्रपटाचं रोमँटिक गाणं लाँच करण्यात आलं आहे. त्यात कॉलेजमध्ये प्रेमात पडणारे प्रेमिक ते लग्नानंतरचे पतीपत्नी असा प्रवास या गाण्यात दाखवण्यात आला आहे.

वैभव तत्ववादी आणि हृता दुर्गुळे यांची उत्तम केमिस्ट्रीही या गाण्यात दिसते. ताल धरायला लावणारं संगीत, हलके फुलके सहजसोपे शब्द असलेलं हे गाणं नक्कीच लक्षवेधी आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी आता उत्सुकता अधिकच वाढलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT