कॉमेडियन आणि अभिनेत्री मल्लिका दुआच्या Mallika Dua आईवडिलांना कोरोनाची लागण झाली. या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी मल्लिकाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित वडील विनोद दुआ Vinod Dua आणि आई चिन्ना कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा नसल्याने त्यांना आता उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. (Comedian Mallika Duas parents hospitalized after testing positive for Covid 19)
मल्लिकाने आईवडिलांना आयसीयू बेड मिळवण्यासाठी ट्विटरवर मदत मागितली होती. रुग्णालयात बेड मिळाल्यानंतर तिने मदत करणाऱ्यांचे आभारही मानले होते. रविवारी मल्लिकाने आईसाठी टॉसिलीझुमाब Tocilizumab या औषधाची तातडीने गरज असल्याची पोस्ट ट्विटरवर लिहिली होती. तिच्या या पोस्टनंतर भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी औषधांची व्यवस्था केली.
हरदीप पुरी यांनी केलेल्या मदतीविषयी सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. ट्विटरवर #MallikaDua ट्रेंड होत आहे. यामागचं कारण म्हणजे, अनेकांनी नेते हे फक्त व्हीआयपी लोकांचीच मदत करत आहेत, अशी एका बाजूने टीका होत आहे. तर दुसरीकडे मल्लिकाने अनेकदा भाजपाच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतरही अडचणीच्या काळात भाजपा नेत्यानेच तिची मदत केल्याचं म्हटलं जातंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.