Complaint filed in Bihar against four Bollywood stars Google
मनोरंजन

'पानमसाला' प्रकरण कोर्टात पोहोचलं; शाहरुख,अजय सोबत अमिताभ,रणवीरही अडचणीत

पान मसाला आणि गुटखा अशा दोन्हींचं प्रमोशन करण्यासंदर्भात बिहारच्या एका कोर्टात या चार बड्या स्टार्स विरोधात केस दाखल केली आहे.

प्रणाली मोरे

गुटखा आणि पान मसाला (Panmasala) सारख्या उत्पादनांची जाहिरात केल्या प्रकरणी बॉलीवूडच्या(Bollywood) बड्या-बड्या अभिनेत्यांना सोशल मीडियावर खूप कोसलं गेलं. आता या प्रकरणामुळे ४ बड्या स्टार्सच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan),रणवीर सिंग,शाहरुख खान(Shah rukh Khan),अजय देवगणच्या विरोधात पान मसाला आणि गुटखा अशा दोन्हींचं प्रमोशन करण्यासंदर्भात बिहारच्या(Bihar) एका कोर्टात केस(Court Case) दाखल केली आहे. ही केस मुजफ्फरपुरमध्ये सामाजिक कार्यकर्ता असलेली तमन्ना हाश्मीनं दाखल केली आहे. जाणून घ्या या पूर्ण प्रकरणाविषयी.

काही दिवसांपूर्वी या पानमसाला प्रकरणावरुन खूप मोठा वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर यामुळे बॉलीवूडच्या बड्या-बड्या कलाकारांवर चांगलेच ताशेरे ओढले गेले होते. खरंतर,जेव्हा अक्षय कुमार ही जाहिरात करताना दिसला तेव्हा या प्रकरणाला वादाचं स्वरुप मिळालं. अक्षयला तंबाखू उत्पादक कंपनीच्या पानमसाला प्रॉडक्टला प्रमोट करताना लोकांनी पाहिलं आणि जणू ते खवळलेच. अक्षयला खूप ऐकावं लागलं. त्यानंतर लगोलग त्यानं चाहत्यांची माफी मागत,जाहिरतीमधून काढता पाय घेतला. तसं त्यानं सोशल मीडियावरच जाहिर करून टाकलं. तसंच,जाहिरातीसाठी जे पैसे त्यानं घेतले आहेत ते सगळे तो दान करणार असल्याचंही जाहिर करुन टाकलं. तर दुसरीकडे शाहरुख,अजय देवगणही या पानमसाल्याची जाहिरात करतात ती देखील चर्चेत आली होती.

अमिताभ बच्चन देखील एका तंबाखू उत्पादन कंपनीच्या प्रॉडक्टला प्रमोट करीत होते. अर्थात आता कळत आहे की गेल्या वर्षीच त्या कंपनीसोबतचा त्यांचा करार संपला आहे. त्यानंतर त्यांनी अधिकृतरित्या एक निवेदन सादर करुन यासंदर्भात माहिती देखील दिली होती. पण असं असलं तरी त्यांच्या डोक्यावरही टांगती तलवार अजून आहेच असं दिसत आहे. सामाजिक कार्यकर्ता असलेल्या तमन्ना हाश्मिनं रणवीर सिंग,अजय देवगण,शाहरुख खान आणि अमिताभ यांच्या विरोधात सेक्शन ४६७,४६८,४३९ आणि १२० B अंतर्गत केस दाखल केली आहे.

चार्जशीटमध्ये या चारही कलाकारांवर पैशांच्या लालसेपोटी आपल्या प्रसिद्धिचा गैरवापर करण्याचा आरोप लावला गेला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार,या केसची सुनावणी आता २७ मे रोजी होईल. तमन्ना हाश्मीचं म्हणणं आहे की,हे चारही कलाकार आपल्या प्रसिद्धिचा गैरवापर करीत आहे. लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सारेच त्यांना फॉलो करतात. तर अशा पद्धतीनं शरीरासाठी हानिकारक असललेल्या उत्पादनाची जाहिरात करून ते लोकांचं आयुष्य धोक्यात आणू शकत नाहीत. तमन्नाच्या म्हणण्यानुसार,या कलाकारांनी जर अशा उत्पादनाची जाहिरात केली तर याचा लहान मुलांवर सर्वात अधिक परिणाम होईलआणि ते देखील याचं सेवन खूप लहान वयात करायला सुरुवात करू शकतात. आणि म्हणूनच आपण ही केस दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

SCROLL FOR NEXT