Controversial statements of paresh rawal and other bollywood celebrities sakal
मनोरंजन

Controversial statement: परेश रावल तर सोडाच.. या सेलिब्रिटींची वादग्रस्त विधानं ऐकून घाम फुटेल..

गेली काही दिवस परेश रावल वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत, पण त्यापेक्षाही गंभीर विधानं इतर सेलिब्रिटींनी केली आहेत.

नीलेश अडसूळ

Controversial statement of bollywood celebrities: अभिनेते-राजकारणी परेश रावल यांच्या नुकत्याच केलेल्या एका विधानाने धुमाकूळ घातला आहे. एवढेच नाही तर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पण केवळ परेश रावलच नाही तर अनेक बॉलीवुड कलाकारांनी अनेकदा खळबळजनक विधानं केली आहेत. त्याच्याच घेऊया थोडक्यात आढावा..

(Controversial statements of paresh rawal and other bollywood celebrities)

झाले असे की परेश रावल यांनी, विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजपच्या प्रचारादरम्यान गुजरातच्या वलसाडमध्ये पक्षाचा प्रचार करताना परेश म्हणाले होते, ',गॅस सिलेंडर महाग आहे,पण हे स्वस्त होईल. लोकांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील. पण काय होईल जेव्हा रोहिंग्या मुसलमान आणि बांग्लादेशी लोक आपल्या आजुबाजूला राहायला येतील. जसं दिल्लीत आता होताना दिसत आहे. तेव्हा गॅस सिलेंडरचं काय कराल? बंगाली लोकांसाठी मासे शिजवाल? या विधानामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहे.

मात्र, असे वादग्रस्त विधान करणारे परेश रावल हे पहिले सेलिब्रिटी नाहीत. रुपेरी पडद्यावर असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी राजकरणात आल्यावर वादग्रस्त विधाने केली होती, ज्याच्याबद्दल त्यांच्यावर सडकून टीका देखील झाली आहे. जे एकेकाळी पडद्यावर आपल्या कलात्मकतेने ठळकपणे प्रसिद्धी मिळवायचे, तेच आज राजकारण करतात आणि अशा गोष्टी बोलतात की ते प्रसिद्धीच्या झोतात येतात.

कमल हसन

दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन ही अनेकदा वादात सापडले आहेत. त्यांच्या आक्रोशामुळे आणि आणि आक्रसताळेपणामुळे ते वादाच्या तोंडाशी राहिले आहेत. अभिनयासोबतच त्यांनी राजकारणातही आपले नशीब आजमावले आहे. तामिळनाडूतील अरवाकुरिची येथे निवडणूक प्रचारादरम्यान कमल यांनी हिंदू कट्टरतावादाबद्दल वादग्रस्त विधान केले होते, ज्यात कमल म्हणाले होते की, 'स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता, ज्याचे नाव नथुराम गोडसे होते आणि येथून दहशतवादाला सुरुवात झाली. एवढेच नाही तर जयललिता यांच्या निधनावर त्यांनी प्रतिक्रिया दिली होती, त्यावरून वाद झाला होता.

स्मृती इराणी

टीव्ही अभिनेत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावर वादग्रस्त विधान केले होते. रक्ताने माखलेले सॅनिटरी नॅपकिन्स घेऊन तुम्ही तुमच्या मित्रांच्या घरी जात नाही, मग देवाच्या मंदिरात कशाला घेऊन जाता, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. त्यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.

जया बच्चन

जया बच्चन यांनी केवळ बॉलिवूडमध्ये नाही तर राजकारणातही प्रसिद्ध नाव आहे. जया बच्चनने अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत. एकदा एका खासदाराशी बोलताना जया बच्चन यांनी भाजप सदस्यांना शिव्याशाप देत त्यांचे वाईट दिवस येणार आहेत, असे म्हटले होते. ते विधान चांगलच गाजलं होतं.

किरण खेर

प्रसिद्ध अभिनेत्री किरण खेर यांनी बलात्कारासारख्या गंभीर घटनेवर अतिशय वादग्रस्त विधान केले होते. चंदीगडमधील सामूहिक बलात्कार प्रकरणावर किरण खेर म्हणाल्या की, उत्तर भारतात विनयभंगाच्या घटना राजरोस घडत असतात. बलात्काराचं म्हणाल तर आजकाल घराघरातही बलात्कार होतात. मात्र, गँगरेपसारख्या घटना ही गंभीर बाब असल्याचे त्यांनीसांगितले. त्यांच्या या वक्तव्यावरून बराच गदारोळ झाला होता.

सनी देओल

अभिनेता ते राजकारणी सनी देओलनेही वादग्रस्त विधाने केली आहेत. #MeToo चळवळीदरम्यान ते म्हणाले होते की,'जग जसे आहे तसेच राहील. या सर्व गोष्टींसाठी कोणालाही टार्गेट करू शकत नाही. या सर्व प्रकरणात कोणीही पडण्याची गरज नाही,' असे ते म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा ३१६५१ मतांनी विजयी

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Tanaji Sawant won Tuljapur Assembly Election Result 2024 : राणाजगजितसिंह पाटील यांच्या पदरी 'जीत', तुळजापूरमध्ये कमळ फुलले

Miraj Assembly Election 2024 Results : मिरज मतदारसंघात सुरेश खाडेंनी ठाकरे गटाच्या तानाजी सातपुतेंवर 44,706 मतांच्या फरकाने केली मात

SCROLL FOR NEXT