मनोरंजन

'सबका साई' पुन्हा वादाच्या भोवऱ्यात...

युगंधर ताजणे

साई बाबांबद्दल वेगवेगळया भाषेत मालिका प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचा प्रतिसादही मिळाला आहे. मात्र काही मालिका त्या लोकप्रियतेला अपवादही आहेत. सध्या मॅक्स प्लेयरवर आलेल्या सबका साई नावाची मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी अनेक मालिका आणि चित्रपट यांनी साई बाबांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाशही टाकला आहे. कित्येकांनी त्यांच्या जीवनातील प्रसंगांना अधोरेखित केलं आहे. प्रेक्षक आणि समीक्षक यांनीही त्या जीवनपटाचं कौतूक केलं आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही मोठा असल्यानं त्याची सर्वपातळीवरुन दखलही घेण्यात आली आहे. सध्या मॅक्स प्लेयरवरील सबका साई पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे.

निर्माते आणि दिग्दर्शक यांनी हा वाद आशयाशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. अनेक प्रेक्षकांचे असे म्हणणे आहे की, सध्याच्या काळात ही मालिका दाखवली जाऊ नये, त्या प्रश्नामागील त्यांची भावना काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न निर्माते आणि दिग्दर्शक यांचा आहे. काही महिन्यांपूर्वी मॅक्स प्लेयरवर प्रख्यात दिग्दर्शक प्रकाश झा यांची आश्रम नावाची मालिका प्रदर्शित झाली होती. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. त्यावरुन अनेक वादही तयार झाले होते. शेवटी तो वाद न्यायालयाच्या दारात गेला होता. अजूनही त्या मालिकेतील कित्येक खटले हे न्यायालयात सुरु आहे. मॅक्स प्लेयरवर गेल्या काही दिवसांत अनेक तक्रारी आल्याची चर्चा आहे. या ओटीटीवरुन अश्लील कंटेट प्रदर्शित होत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

सबका साई ही मालिका २६ ऑगस्ट पासून मॅक्स प्लेयरवर प्रदर्शित होणार आहे. मात्र ती प्रदर्शित होण्यापूर्वीच तिला अनेक वादांना सामोरं जावं लागत आहे. ट्विटरवरुन अनेकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. त्यावर काही नकारात्मक पोस्टही समोर आल्या आहेत. सध्या जग एका वेगळ्या संकटातून जात असताना अशावेळी आपण कोणत्या पद्धतीचा आशय लोकांना देतो आहोत असा प्रश्न प्रेक्षक विचारताना दिसत आहे.

त्या शो वरुन जे प्रश्न उपस्थित केले जात आहे त्यावर सबका साईचे दिग्दर्शक अजित भैरवकर यांचे म्हणणे आहे की, सध्या विज्ञान आणि चिकित्सा यांच्यात यशस्वीतेचे प्रमाण काही कमी नाही. विज्ञानाचे चमत्कार आपण सध्या पाहतो आहोत. डॉक्टरांनी केलेल्या परिश्रमामुळे आपल्याला मोठा दिलासा मिळाला आहे. सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या श्रेयाला आपण मान द्यायला हवा. समाजात असे काही नकारात्मक लोक असतात की ज्यांना कायम कोणत्या ना कोणत्या प्रकारचा वाद हवा असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Rane: संपूर्ण ताकद त्यांच्या मागे उभी करू; निलेश राणेंच्या शिवसेना प्रवेशाबाबत सामंत यांची प्रतिक्रिया

Vinesh Phogat: 'पंतप्रधान मोदींशी फोनवर बोलण्यास मी नकार दिला कारण...', विनेशचा खळबळजनक दावा

Dasara Melava 2024 : दसरा मेळाव्यासाठी गावागावात जनजागृती करणार; फुलंब्रीत मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्याकडून अधिकृतरीत्या जनसुराज्य या राजकीय पक्षाचे लाँचिंग; पहिल्या अध्यक्षांबाबत जाणून घ्या

Shardiya Navratri 2024 : नवरात्रौत्सवाची सुरूवात होणार, जाणून घ्या शास्त्रोक्त पद्धतीने घटस्थापना कशी करावी?

SCROLL FOR NEXT