ms dhoni, ms dhoni first movie, lets get married SAKAL
मनोरंजन

Lets Get Married: क्रिकेटचं मैदान गाजवून धोनी आता करणार मनोरंजन, पहिल्या सिनेमाची घोषणा

धोनीच्या पहिल्या सिनेमाची घोषणा झाली आहे.

Devendra Jadhav

M. S. Dhoni Lets Get Married: भारतीय क्रिकेटर एम . एस. धोनी याने जगभरातली मैदान त्याच्या दमदार खेळाने गाजवली. क्रिकेटचं मैदान गाजवून धोनी आता मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करतोय. धोनीच्या पहिल्या सिनेमाची घोषणा झाली आहे. लेट्स गेट मॅरिड असं या सिनेमाचं असून धोनीने त्याच्या प्रोडक्शन कंपनी अंतर्गत त्याच्या पहिल्या सिनेमाची मोशन पोस्टर काढून घोषणा केलीय.

धोनीची बायको साक्षीच्या हस्ते लेट्स गेट मॅरिड सिनेमाच्या सेटवर पूजा झाली. यावेळी सिनेमाचे सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. या सिनेमाचा शॉर्ट फॉर्म होतो LGM. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन धोनी आता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. विशेष गोष्ट म्हणजे , धोनीने पहिल्या निर्मितीसाठी बॉलिवूड न निवडता टॉलिवूडचा सिनेमा निवडला आहे

धोनीच्या स्वतःच्या आयुष्यावर आधारीत एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी सिनेमा रिलीज झालेला. २०१६ साली आलेल्या या सिनेमात दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने धोनीची भूमिका साकारली होती. हा सिनेमा प्रेक्षक आणि समीक्षकांकडून नावाजला गेला. धोनीने स्वतः निर्मीती करत असलेल्या सिनेमाच्या मोशन पोस्टरला अल्पवधीतच प्रेक्षकांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झालाय

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले. धोनी हा जगातील महान खेळाडूंपैकी एक मानला जातो. आता या सिनेमाच्या निमित्ताने क्रिकेटनंतर माही फिल्मी दुनियेवर अधिराज्य गाजवण्यास सज्ज झालाय. त्याने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस उघडले आहे. महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर तो क्रिकेटविश्वातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जातो. त्याने भारताचे नेतृत्व करताना 2007 मध्ये टी20 विश्वचषक, 2011मध्ये वनडे विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhaji nagar Central: किशनचंद तनवाणी यांनी तिकीट परत का केलं? शिवसेना प्रवेशांच्या चर्चांवर दिलं थेट उत्तर

IPL Retention 2025 : Shreyas Iyer ला वगळून कोलकाता नाइट रायडर्सचे 'हम पाँच'ठरले! कर्णधारालाच का बाहेर केले?

Diwali Bank Holidays: दिवाळीमुळे बँका कधी बंद राहतील? 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर? जाणून घ्या

Ulhasnagar Assembly constituency 2024 : उल्हासनगरात कुमार आयलानी आणि ओमी कलानी यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

Eknath Shinde Property: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीत पाच वर्षात 26.12 कोटींची वाढ; जाणून घ्या डिटेल्स

SCROLL FOR NEXT