महेंद्र सिंग धोनीच्या बायोपिक नंतर आता भारतीय क्रिकेट टीमचा दादा म्हणजेच सौरव गांगुली वर बायोपिक तयार होतोय. लव फिल्म्सद्वारे या बायोपिकची निर्मिती केली जाणार आहे. सौरव गांगुली स्वतः त्याच्या बायोपिक मध्ये जातीने लक्ष देतोय. पटकथा हा कोणत्याही सिनेमाचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे मंगळवार 24 जानेवारीला स्क्रिप्ट फायनल करण्यासाठी दादा मुंबईत येतोय. काल २३ जानेवारीला सौरव मुंबईत आलाय. आणि आज मंगळवारी स्क्रिप्टच्या पुढील टप्पा लॉक करण्यासाठी सौरव स्क्रिप्ट आणि पटकथा ऐकणार आहे.
सौरव गांगुलीच्या आयुष्यावर बायोपिक पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत. ९ सप्टेंबर २०२१ ला लव फिल्म्स आणि सौरव गांगुली यांनी मिळून या बायोपिकची घोषणा केली. दोन वर्षांच्या रिसर्च नंतर सिनेमाची स्क्रिप्ट जवळपास तयार झाली आहे. पण पुढचे काम सुरू करण्यापूर्वी निर्मात्यांना सौरव गांगुलीची परवानगी घ्यायची आहे. अशा परिस्थितीत भारताचा माजी कर्णधार सौरव सोमवारी रात्री त्याचा मित्र संजय दाससोबत सिनेमाच्या स्क्रिप्टला हिरवा कंदील देण्यासाठी मुंबईला जाणार आहे.
सौरव गांगुली सिनेमाची स्क्रिप्ट व्यवस्थित होण्यासाठी प्रचंड आग्रही आहे. सौरव सिनेमाच्या प्रत्येक गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी काटेकोरपणे लक्ष देत आहे. सौराव आज मंगळवारी फायनल स्क्रिप्टसाठी मुंबईत सिनेमाचे निर्माते आणि लेखकांसोबत चर्चेसाठी बसणार आहे. सौरवला बायोपिकसाठी अजिबात घाई करायची नाही. सर्वकाही सुरळीतपणे व्हावे अशी त्याची इच्छा आहे. त्यामुळे सौरव लिखाणाला आणि सिनेमाच्या पटकथेला व्यवस्थित वेळ देतोय.
सौरव गांगुलीच्या जीवनावर बायोपिक येण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, अझरुद्दीन आणि कपिल देव यांच्यावरही बायोपिक बनवण्यात आले आहेत. याशिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सुद्धा स्वतःचा अनोखा बायोपिक बनवला. सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये गांगुलीची भूमिका कोण करणार याबाबत कोणतीही माहिती नाही. या सिनेमाचे बजेट जवळपास 250 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.