CV Dev Malayalam actor passed away at the age of 83 SAKAL
मनोरंजन

C V Dev Death: दिग्गज साऊथ अभिनेते सी. व्ही. देव यांचं निधन, मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

सीव्ही देव यांनी 1959 मध्ये 'विलाक्किन्ते वेलीचाथिल' या मल्याळम नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

Devendra Jadhav

Actor C V Dev Death News: मल्याळम अभिनेता सीव्ही देव यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये वयाशी संबंधित आजारांवर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांनी 100 हून अधिक चित्रपट आणि अनेक नाटकांमध्ये काम केले. याशिवाय बहुतेक सिनेमांमध्ये विनोदी भूमिका केल्या. सीव्ही देव यांनी 1959 मध्ये 'विलाक्किन्ते वेलीचाथिल' या मल्याळम नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

(CV Dev Malayalam actor passed away at the age of 83)

अभिनेता सीव्ही देव यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. ते 83 वर्षांचे होते. कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते गेल्या काही दिवसांपासून वयोमानानुसार आजारी होते.

नुकतीच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीव्ही देव हृदयाच्या आजाराशी सुद्धा झुंज देत होते. त्याच्यावर कोझिकोड मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

सीव्ही देव यांचा जन्म 1940 मध्ये चमारथूर येथे झाला. 1959 मध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. गेल्या अनेक दशकांपासून ते इंडस्ट्रीत सक्रिय होते.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या काही प्रमुख चित्रपटांमध्ये 'साध्याम', 'ई पुझायुम कदन्नू', 'मिझी रांडीलम', 'चंद्रोलसवम' यांचा समावेश आहे. एकूणच एक दिग्गज अभिनेता आपल्यातून गेल्यामुळे कलाकारांनी शोक व्यक्त केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT