Dada Kondke Movie esakal
मनोरंजन

Dada Kondke Movie : 'दादा तुमची एकूण प्रॉपर्टी किती'?, दादांनी जे उत्तर दिलं त्यावरुन कळलं की...

विनोदी चित्रपटांवर अनभिषक्तपणे आपलं वर्चस्व गाजवणाऱ्या दादांच्या चित्रपटांवर एका गटानं नेहमीच नाराजी व्यक्त केली.

युगंधर ताजणे

Dada Kondke Movie : मराठी चित्रपट विश्वामध्ये दादा कोंडके यांनी अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. सर्वाधिक काळ बॉक्स ऑफिसवर चालणारा मराठी चित्रपट, सर्वाधिक गर्दी खेचणारा चित्रपट, लागोपाठ कित्येक आठवडे चालणारा मराठी चित्रपट अशा वेगवेगळे आरोप आपल्या नावावर करणाऱ्या दादांच्या चित्रपटावर द्विअर्थीचा शिक्का नेहमीच मारला गेला.

विनोदी चित्रपटांवर अनभिषक्तपणे आपलं वर्चस्व गाजवणाऱ्या दादांच्या चित्रपटांवर एका गटानं नेहमीच नाराजी व्यक्त केली. त्यांच्यावर टीका केली. त्यावरुन मोठा वादही झाला. दादांचे चित्रपट हे कुटूंबासमवेत पाहण्याचे चित्रपट नाहीत असे म्हटले गेले. आजही वेगवेगळ्या ओटीटीच्या जीवघेण्या स्पर्धेत दादांचे चित्रपट पाहायचे म्हणजे डेरिंग करावीच लागते. असे म्हणावे लागेल.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

दादांनी त्यांच्या चित्रपटातून मराठी भाषेचा ज्यापद्धतीनं उपयोग करुन घेतला त्याला तोड नाही. मराठी भाषा आणि भाषेचे विनोदी प्रयोग, शब्दांचा हुकमी वापर, म्हणी, वाकप्रचार, द्विअर्थी प्रयोग याचे सारे मिश्रण आपल्याला दादांच्या चित्रपटात पाहायला मिळते. त्यामुळेच की काय दादांचे चित्रपट तुम्ही परिवारासमवेत पाहायला जाता तेव्हा काही काळ का होईना छातीत धस्स व्हायला होतं. आपण थोडं घाबरुन जातो. त्याला कारण दादांच्या चित्रपटातील संवाद.

काहीवेळा असेही वाटून जाते की, हल्ली नेटफ्लिक्सवरील कंटेट हा कुटूंबासमवेत पाहता येतो पण दादांचे चित्रपट पाहायचे म्हणजे थोडी डेरिंगचेच काम आहे. दादा कोंडके यांची येत्या ८ ऑगस्टला ९१ वी जयंती आहे. यानिमित्ताने झी टॉकीज या वाहिनीवर “ज्युबिली स्टार दादा” हा दादांच्या ६ सुपरहिट सिनेमांचा सीझन ६ ऑगस्टपासून दर रविवारी सुरू होत आहे. मराठी सिनेमातील विनोदाचा सम्राट अशी ओळख कमावलेले अभिनेता, दिग्दर्शक दादा कोंडके यांनी मराठी सिनेसृष्टीतच नव्हे तर हिंदी कलाकारांच्या मनावरही राज्य केलं आहे.

दादा कोंडके यांचा सिनेमा प्रदर्शित होणार म्हटलं की बॉलीवूडच्या भल्याभल्या निर्मात्यांनाही धडकी भरायची. दादांचा सिनेमा एकदा का थिएटरला लागला की तो किमान २५ आठवडे काही उतरायचा नाही हे समीकरणच होते. बॉलीवूडमधील नायकच नव्हे तर खलनायकही दादांच्या अभिनयावर फिदा होते. दादांविषयी भरभरून बोलणाऱ्यांच्या यादीत हिंदी कलाकारांचीही कमी नव्हती.

दादांच्या अनेक आठवणींना कलाकार मंडळी उजाळा देत असताना हिंदी सिनेमातील प्रख्यात अभिनेते शक्ती कपूर यांनीही दादांची एक खास आठवण शेअर केली आहे. एक व्हिडिओ शेअर करत शक्ती कपूर यांनी दादांच्या अभिनयाचे तर कौतुक केले आहेच पण दादा एक माणूस म्हणून किती दिलदार होते यावरही त्यांनी मोहर उमटवली आहे.

शक्ती कपूर या व्हिडिओत असं सांगत आहेत की, “दादांसोबत काम करायला मिळणं हे त्या काळात खूप काही शिकण्यासारखं होतं. मीदेखील यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. मी दादांसोबत ‘आगे की सोच’ या सिनेमात काम केलं. या सिनेमाचं शूटिंग दादांच्या फार्म हाऊसवरच सुरू होतं. मी सहज दादांना विचारलं की, या तुमच्या फार्महाउसचा एरिया किती आहे. दादांनी तेव्हा मला जे उत्तर दिलं ते ऐकून मी अवाक् झालो.दादा म्हणाले, तुझी जिथंपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हे आपलंच फार्म हाऊस आहे.

इतक्या मोठ्या जागेचा मालक माझ्यासमोर होता आणि त्याला अजिबात गर्व नव्हता. आजकाल आपल्या संपत्तीचा डामडौल करणारी मंडळी पाहिली की मला दादांच्या त्या संवादाची आठवण येते. आम्ही जोपर्यंत त्या फार्म हाऊसवर शूटिंग करत होतो, तेव्हा दादांनी मला गावचं जेवण खायला दिलं आणि माझं मन तृप्त केलं.गावी रोज संध्याकाळी दादांकडे खूप लोक यायची. गावातील काही तरूण यायचे, म्हातारी माणसे यायची आपल्या समस्या मांडायचे आणि दादा त्यांना मुक्त हस्ते मदत करायचे. दादांनी कधीही त्यांच्या दातृत्वाची दवंडी पिटली नाही.

ॲडव्हान्स इनकम टॅक्स भरणारे दादा कोंडके एकमेव कलाकार असतील. ते नेहमी ज्यादाची रक्कम टॅक्स भरून ठेवायचे जेणेकरून त्यावरून त्यांच्याकडे कुणी बोट दाखवू नये असे त्यांना वाटायचे. सध्या अशी माणसं देवाने बनवणं बंद केलय . एक अत्यंत काटेकोर, शिस्तबध्द आणि तितकेच संवेदनशील माणूस असलेल्या दादांनी मराठी सिनेसृष्टीला जे सिनेमे दिले आहे ते कधीच जुने होणार नाहीत इतका त्यात उत्साह आहे.”

मराठी सिनेमाचे “शो मॅन” अशी ख्याती असलेल्या दादा कोंडके यांनी दोन दशके प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या सिनेमांची मेजवानी दिली. त्यापैकी ६ सुपरहिट सिनेमातून हास्याचे धबधबे ६ ऑगस्टपासून दर रविवारी दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता झी टॉकीजद्वारे प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT