Dadasaheb Phalke birth anniversary father of indian cinema career struggle films wife family personal life  sakal
मनोरंजन

Dadasaheb Phalke: लोकांनी आधी वेड्यात काढलं पण नंतर बैलगाडी भरून पैसे घरी येऊ लागले.. दादासाहेब फळकेंचा जीवनपट..

दादासाहेब फाळके यांचा आज जन्मदिवस.. जाणून घेऊया ही खास बात..

नीलेश अडसूळ

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची आज जयंती. त्यांनी निर्माण केलेली ही चित्रपटाची जादू आज भारतभर पसरलीच नाही ते एक मोठं क्षेत्र बनली. म्हणूनच त्यांना चित्रपट महर्षी म्हणून ओळखले जाते. अशा दादासाहेब फाळके यांची आज जयंती. त्यानिमित्ताने पाहूया त्यांचा थोडक्यात जीवनप्रवास..

दादासाहेबांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला. दादासाहेबांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या कला शिकण्याची आवड होती. त्यामुळे मराठा हायस्कूल, मुंबई येथे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1885 मध्ये त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून एक वर्षाचा चित्रकलेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला.

त्यानंतर त्यांनी तैलरंगचित्रण, जलरंगचित्रण, वास्तुकला आणि नमुना प्रतिरूपण (मॉडेलिंग) यामध्ये सण 1890 ला प्रावीण्य मिळवले.

(Dadasaheb Phalke birth anniversary father of indian cinema career struggle films wife family personal life )

पुढे दादासाहेब आपण स्वदेशी चित्रपट बनवायचा या विचाराने झपाटून गेले. आणि काही दिवसातच त्यांनी मुंबई (दादर) येथे फाळके चित्रपटनिर्मितिगृहाची स्थापना केली आणि सहा महिन्यात मुंबईच्या कोरोनेशन चित्रपटगृहामध्ये 1913 पहिला मूक चित्रपट तयार केला.त्याच नाव आहे ‘राजा हरिश्चंद्र‘ (Raja Harishchandra) हा चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील पहिला चित्रपट आहे.

आपल्या 19 वर्षांच्या कारकिर्दीत 1937 पर्यंत दादासाहेब फाळकेंनी सुमारे 95 चित्रपट आणि 26 लघुपटांची निर्मिती केली. दादासाहेबांच्या या धडपडीमागे त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई (दुसरी पत्नी) यांची मोलाची साथ होती. आपल्या पतीचे स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी सरस्वतीबाईंनी आपले दागिने देखील विकले.

चित्रपटाशी संबंधित लोकांचा स्वयंपाक करणे, त्यांचे कपडे धुणे, त्यांच्या राहण्याची सोय करणे, शिवाय हे करून चित्रपटाशी संबंधित एडिटिंग, मिक्सिंग, फिल्म डेव्हलपिंग, कॅमेरा असिस्टंट, स्पॉट बॉय या भूमिका देखील त्यांनी पार पाडल्या.

रात्री सर्व मंडळी झोपल्यानंतर त्या चित्रपटाशी संबंधित समस्यांवर आपल्या पती आणि इतर सहकाऱ्यांसमवेत होणाऱ्या चर्चेत देखील सहभागी होत. सरस्वती बाईंच्या सहकार्याशिवाय हा चित्रपट तयारच होऊ शकला नसता. असे फाळकेनी एका मुलाखतीत सांगितले होते.

दादासाहेब फाळकेंनी चित्रपट तयार करायला सुरूवात केल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारायला लागली. तसेच त्यांच्या अनेक चित्रपटांनी थिअटरला चांगली कमाई देखील केली. त्या काळात त्या चित्रपटातून इतके पैसे मिळाले की त्यांच्याल घरी बैलगाडीभरून पैसे येतं होते. त्यानंतर पुढे त्यांनी अनेक प्रयोग केले, अनेक चित्रपट केले. आज आपण जे काही चित्रपट पाहत आहोत, त्यामागे दादासाहेब फाळके यांचे अथक परिश्रम आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT