dangerous khatra ram gopal varma controversial lesbian film set to release theaters  
मनोरंजन

देशातील पहिली लेस्बियन लव्हस्टोरी 'खतरा : डेंजरस' सेन्सॉर बोर्डकडून पास

सकाळ डिजिटल टीम

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Verma) हे वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात. राम गोपाल वर्मा यांचा चित्रपट क्षेत्रातील चाहता वर्ग देखील पुर्णपणे वेगळा आहे आणि हे चाहते त्यांच्या चित्रपटांची वाट पाहत असतात. अशा परिस्थितीत भारतात पहिल्यांदाच एका लेस्बियन प्रेमकथेवर आधारित राम गोपाल वर्मा यांचा बहुचर्चित चित्रपट 'खतरा : डेंजरस' (Dangerous: Khatra) सेन्सॉर बोर्डाने पास केला असून तो आता रिलीजसाठी सज्ज झाला आहे.

भारतात लेस्बियन प्रेमकथेवर पहिल्या बनलेला हा राम गोपाल वर्माचा सर्वात वादग्रस्त चित्रपट 'खतरा: डेंजरस' अखेर 8 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे . हा चित्रपट त्याच्या बोल्ड विषयासाठी आणि स्त्री समलैंगिक प्रेमकथा आणि यातील अनेक बोल्ट सीनमुळे सेन्सॉर बोर्डाकडून पास होण्याच्या प्रतिक्षेत होता आणि त्यानंतर ए प्रमाणपत्र (A Certificate) देऊन हा चित्रपट सेन्सॉर बोर्डने पास केला.

राम गोपाल वर्मा यांनी ट्विटरवर चित्रपटाच्या पोस्टरवर रिलीजची तारीख शेअर करून आनंद व्यक्त केला. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत राम गोपाल वर्मा म्हणाले होते की,आम्हाला जास्त अपेक्षा नव्हती. 'खतरा: डेंजरस' सेन्सॉर बोर्डाकडून पास होईल याची आशा नव्हती कारण ही दोन महिलांमधील प्रेमकथा आहे, परंतु कलम 377 रद्द केल्यानंतर समलैंगिक संबंधांवर बंदी उठवण्यात आली. आता समलैंगीक संबंध कायदेशीर केले आहेत. 'खतरा: डेंजरस' या पहिल्या भारतीय लेस्बियन चित्रपटाला ए प्रमाणपत्र मिळाले याचा मला खूप आनंद आहे, जर त्याला ए प्रमाणपत्र मिळाले नसते तर मी खूप निराश झालो असतो.

अप्सरा आणि नैना मुख्य भूमिकेत

या चित्रपटाची कथा दोन महिलांमधील प्रेम आणि त्यांच्या समलैंगिक संबंधांवर आधारित आहे. या पुरुषप्रधान समाजात जे असमाधानी आहेत ते एकमेकांकडे आकर्षित होतात. या क्राईम थ्रिलर-ड्रामा चित्रपटात अतिशय बोल्ड आणि इंटिमेट सीन्स शूट करण्यात आले आहेत. या चित्रपटात साऊथ चित्रपटातील हॉट सायरन्स अप्सरा राणी आणि नयना गांगुली मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT