Makarand anaspure news  esakal
मनोरंजन

'मल्टिप्लेक्सचं तिकिट परवडणारं नाही म्हणून...' मकरंद अनासपुरेंची भन्नाट आयडिया!

मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाही, थिएटर मिळत नाही अशी ओरड ही आजची नाही. ती गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे.

युगंधर ताजणे

Marathi Movie News: मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाही, थिएटर मिळत नाही अशी ओरड ही आजची नाही. ती गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्यात आता तर थिएटर मालकांकडून मराठी चित्रपटांना डावललं जातं हे अनेकदा दिसून आले (De Dhakka Movie) आहे. यासगळ्यावर प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सकाळला दिलेल्या मुलाखतीमध्ये परखडपणे भाष्य केले आहे. दे धक्काच्या (Makarand Anaspureटीमशी संवाद साधताना मकरंद यांनी आगामी काळात मराठी प्रेक्षक आणि मराठी चित्रपट यांच्यासाठी काय करता येईल यावर प्रभावीपणे आपली भूमिका मांडली आहे.

प्रेक्षक मिळतो आहे. तुम्ही जर त्यांना चांगल्या कलाकृती दिल्या तर त्या प्रेक्षकांना आवडतात. मराठी चित्रपटांना थिएटर हे मिळतात. टाईमपास 3 ला चारशे थिएटर मिळाले. याबाबत मी माझे उदाहरण सांगतो जेव्हा मी नटसम्राट केला, शिवाजीराजे भोसले केला त्यावेळी परिस्थिती अशी होती की, दुपारी शो वाढवले जात होते. थिएटर मालकांची भूमिका यासगळ्यात महत्वाची आहे. थिएटर मिळत नाही असं लोकं जे म्हणतात ते खोटं आहे. चित्रपट चालणारा असेल तर शो ची संख्या वाढवली जाते. असं यावेळी मांजरेकर यांनी सांगितलं.

मकरंद अनासपुरे म्हणाले की, आपल्याकडे मल्टिप्लेक्सचा जो प्रेक्षक आहे तो पूर्ण वेगळा आहे. महाराष्ट्रात सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटूंबांची संख्या अधिक आहे. तो चित्रपटांचा आनंद घेणारा आहे. दे धक्काच्या बाबत बोलायचे झाल्यास, या चित्रपटाचा ग्रामीण प्रेक्षकवर्ग आहे. प्रेक्षकांना गेल्या 14 वर्षांपासून हा चित्रपट भावतो आहे. जर प्रेक्षकांना त्यांच्या बजेटमध्ये चित्रपट पाहायला मिळाला तर त्यांनी तो पाहावा. राज्यकर्त्यांनी या गोष्टीचा बारकाईनं विचार करावा.

मला एक चित्रपट करायचा आहे. त्याचे कारण मला त्यात कोणतीही तडतोड करायची नाही. म्हणून मी तो बाजूला ठेवला आहे. त्याचे नाव वीर दौडले सात...तो चित्रपट मला मोठ्या दिमाखदार पद्धतीनं तयार करायचा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. बाहुबलीचं बजेट तीनशे कोटींचे आहे. आपलं बजेट त्या तुलनेत काहीच नाही. म्हणून मी अजुनही वाट पाहतो आहे. कंटेट, क्राफ्ट नुसार आपण कुठेही कमी नाही. मराठीचा तीन कोटींचा सिनेमा हा तीनशे, चारशे कोटींच्या चित्रपटासमोर उभा राहतो. याचाही विचार प्रेक्षकांनी करावा. यासाठी प्रेक्षकांची साथ महत्वाची आहे. असं मांजरेकर यांनी यावेळी सांगितले.

मराठी चित्रपटांना थिएटर आणि प्रेक्षक मिळावेत यासाठी काय करता येईल यावर मकरंद अनासपुरे म्हणाले की, पुणे, मुंबई साराख्या मुख्य शहरांमध्ये अनेक नाट्यगृहे आहेत, त्या नाट्यगृहांचा वापर चित्रपटगृहे म्हणून ही केला जाऊ शकतो. यासाठी तिकेटे ही स्वस्त असले की नक्कीच जास्तीत जास्त प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी येतील. यासगळ्यात राज्यकर्त्यांची भूमिका महत्वाची आहे.

ग्रामीण भागातून शहराकडे किंवा इतर कोठेही जाण्यासाठी एसटीच्या वेळा ठरलेल्या असतात. अशात कामानिमित्त दररोज एसटीने प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांना स्टँडवर प्रवासी तासंतास थांबावे लागते. अशा वेळी त्यांच्या साठी या नाट्यगृहांचा वापर स्वस्तात चित्रपट दाखविण्यासाठी करावा. मल्टिप्लेक्सचे तिकट प्रत्येकाला परवडणारे नसतात, त्यामुळे असा स्‍वस्त पर्याय असला तर मराठी चित्रपट संस्कृती नक्कीच अधिक रुजेल. असंही मकरंद यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT