Aryan Arora Attack Case:  Esakal
मनोरंजन

Aryan Arora Attack Case: सलमान खानसोबत काम केलेल्या अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला! डोक्याला पडले 12 टाके

कार पार्किंगच्या वादामुळे आर्यनचा केअरटेकरसोबत वाद झाला होता.

Vaishali Patil

Aryan Arora Attack Case: बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता आर्यन अरोराबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आर्यन अरोरावर जीवघेणा हल्ला झाला आला. ढिल्लन क्रिकेट अकादमीमध्ये सायंकाळी ही घटना घडली.

कार पार्किंगच्या वादामुळे आर्यनचा केअरटेकरसोबत वाद झाला. वादानंतर केअरटेकरने आर्यनवर स्टंपने हल्ला केला. ज्यामुळे आर्यनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. इतकच नाही तर या हल्ल्यामुळे आर्यनच्या डोक्याला 12 टाके पडले आहेत.

आर्यनचे वडील आणि समाजवादी पक्षाचे नेते मधुकर अरोरा यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, 18 वर्षीय आर्यन आपल्या मित्रांसोबत क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी कार पार्क करण्यावरून वाद झाला. हा वाद वाढला आणि अकादमीच्या केअरटेकरने त्याला मारहाण केली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. आर्यन त्याच्या आईसोबत मुंबईला शिफ्ट झाला आहे. सुट्ट्यांमध्ये तो आपल्या गावी आग्रा येथे गेला होता. तेथेच त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता आर्यनवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी न्यू आग्रा पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक राजीव सिंह यांनी सांगितले की, कुटुंबीयांच्या तक्रारीवरून कलम 307, 323, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार आहे.

आर्यनने सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि परिणीती चोप्राच्या 'जबरिया जोडी' या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. त्याने काही चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे.

त्याने सलमान खानसोबतही काम केले आहे. आर्यनने गुंजन सक्सेना, राधे यांसारख्या मोठ्या चित्रपटात काम केले आहे. ब्रोकन बट ब्यूटी फुल, आउट ऑफ लव्ह, सुलतान यांसारख्या वेब सिरिजमध्ये तो झळकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT