Dipika Chikhlia as Sita News: आज रामायण मालिकेत सीताची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलीया यांचा वाढदिवस. अशी एक भूमिका असते जी त्या कलाकाराची ओळख बनून जाते.
अभिनेत्री दीपिका चिखलीया यांना अशीच ओळख रामायण मालिकेतील सीता या भूमिकेमुळे मिळाली. रामायण मालिकेतील अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
रामायण मालिकेतील भूमिका साकारणारे कलाकार आजही प्रेक्षकांच्या मनात प्रेमाचे स्थान मिळवून आहेत.
सीता साकारणाऱ्या दीपिका यांनाही प्रेक्षकांचं अतोनात प्रेम मिळालं. परंतु हीच भूमिका साकारण्याआधी दीपिका यांना कडाडून विरोध झालेला. काय होतं कारण जाणून घ्या..
(Deepika Chikhlia faced intense opposition to play Sita in ramayana due to this reason)
बी ग्रेड सिनेमांपासून झालेली करियरची सुरुवात
दीपिका चिखलीया यांनी १९८३ ला आलेल्या सून मेरी लैला या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पुढे रुपये दस करोड, घर का चिराग, खुदाई अशा सिनेमांमधून दीपिका यांनी अभिनय केला.
१९८६ ला मात्र दीपिका यांची प्रचंड चर्चेत आली, कारण सुद्धा तसंच काहीसं होतं. चिख सिनेमातील बोल्ड सिन मुळे दीपिका यांची चर्चा झाली.
पुढेही रात के अंधेरे मैं या सिनेमात सुद्धा दीपिका यांनी बोल्ड सीन्स दिल्या. यापुढे बी ग्रेड सिनेमात बोल्ड सीन्स देणारी नायिका म्हणून दीपिका यांची चर्चा झाली.
रामायण मालिकेत काम करण्यास विरोध
बी ग्रेड सिनेमातील नायिका म्हणून दीपिका यांच्यावर शिक्कमोर्तब लागला होता. अशातच दीपिका यांना रामायण सिनेमाची ऑफर मिळाली. रामायण सिनेमात दीपिका सीतेची भूमिका साकारणार होत्या.
जेव्हा ही खबर बाहेर आली तेव्हा मात्र लोकांनी या गोष्टीला कडाडुन विरोध केला. दीपिका यांची प्रतिमा बी ब्रेड सिनेमात काम केल्याने वेगळी झाली होती.
त्यामुळे सीता ही भूमिका दीपिका यांनी साकारू नये, अशी मागणी करण्यात आली. परंतु रामानंद सागर यांनी कोणाचंही ऐकलं नाही.
सीता ही दीपिकाच साकारणार यावर रामानंद सागर ठाम होते. पुढे दीपिका यांनी सीता साकारली आणि अजरामर केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.