Deepika Padukone visits Tirumala temple with sister Anisha  Esakal
मनोरंजन

फायटरच्या रिलीजपूर्वी दीपिका पोहचली तिरुमाला मंदिरात दर्शनाला! भगवान वेंकटेश्वरांच्या चरणी लीन

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दीपिकाचे देवदेर्शन!

Vaishali Patil

Deepika Padukone visits Tirumala temple with sister Anisha: सध्या सेलिब्रिटी आणि देवदर्शन हे यमक जुळलेले दिसत आहे. काही दिवसांपुर्वी शाहरुख खान वैष्णो देवीच्या दर्शनाला गेला होता.

आता काल पुन्हा शाहरुख शिर्डीच्या साई बाबांच्या दर्शनाला गेला होता. आता बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही देव दर्शनाला पोहचली आहे. दीपिका पदुकोण सध्या तिच्या आगामी 'फायटर' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

दरम्यान, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दीपिका तिच्या बहिणीसह भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहचली. दिपिकाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

दीपिकाने तिची बहीण अनिशासोबत गुरुवारी संध्याकाळी तिरुमलाला येथील भगवान वेंकटेश्वराचे आशीर्वाद घेतले. यावेळी तिने काळ्या रंगाचा को-ऑर्डर सेट घातला होता. सध्या दीपिकाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

हे मंदिर विष्णूचे रूप वेंकटेश्वर यांना समर्पित असल्यात. त्यांनी कलियुगातील संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेतला होता असे मानले जाते.

त्यामुळे या जागेला कलियुग वैकुंठ असं नाव पडलं आहे. आता दीपिकाने देवाचे दर्शन घेत तिच्या आगामी चित्रपटाच्या यशासाठी साकडं घातल्याच्या चर्चा आहेत.

दीपिका पदुकोण सध्या तिच्या आगामी अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'फायटर'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला, ज्यामध्ये हृतिक, दीपिका आणि अनिल कपूर यांचे खतरनाक लूक दिसले. तर हृतिक आणि दीपिकाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना आवडली आहे.

हृतिक आणि दीपिकाचा फायटर हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने 'फाइटर'चे दिग्दर्शन केले आहे. ज्याची निर्मिती Viacom18 Studios आणि Marflix Pictures यांनी केली आहे. तर दुसरीकडे दीपिका सिंघम अगेन या चित्रपटातही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT