Deepika Padukone Comment On Nepotism after Kangana Ranaut : बॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री दीपिका ही सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील टॉपची सेलिब्रेटी आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दीपिकाचे नाव पहिल्या तीनमध्ये आहे. अशावेळी दीपिका आता तिच्या एका वक्तव्यामुळे चाहत्यांच्या, नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.
बॉलीवूडमधील नेपोटिझम हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. यावरुन अनेकदा वेगवेगळ्या प्रकारे वादही झाला आहे. २००७ मध्ये बॉलीवूडमध्ये डेब्यू केलेल्या दीपिकानं यावेळी नेपोटिझमवर स्पष्टपणे तिची भूमिका मांडली आहे. यापूर्वी अभिनेत्री कंगनानं तिच्या शैलीत नेपोटिझमवर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर दीपिका बोलली आहे.
नेपोटिझमवर दीपिका काय बोलली...
दीपिकाला जेव्हा इनसायडर आणि आऊटसायडर याविषयी प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी तिनं स्पष्टपणे तिची भूमिका मांडली. माझ्याजवळ तर कोणताच चॉईस नव्हता. त्यामुळे मी नेहमीच समोर येईल त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकवेळी यशस्वी झाले असे नाही, पण प्रयत्न करत राहिले आणि मला यश मिळत गेले.
पंधरा ते वीस वर्षांपूर्वी मी बाहेरची होती. आता मी त्यांच्यापैकी एक आहे. कोणत्याही व्यक्तीला त्याच्या फिल्डमध्ये स्वताचे नाव कमविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तुमचे आई वडील कोण आहेत याच्याशी कुणाला काही देणेघेणे नसते. तुम्ही आणि तुमचे काम, तुमची कार्यक्षमता हे सारे महत्वाचे आहे. नेपोटिझमसारखी गोष्ट ही कधीही संपणारी नाही. ती यापुढील काळातही सुरुच राहणार असेही दीपिकानं यावेळी सांगितले.
दीपिकानं एका नव्या शहरात तिच्या कुटूंबिय आणि मित्र परिवारांसोबत वेळ व्यतीत न करता येण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ती म्हणते, मला माझ्या प्रोजेक्टमुळे पुरेसा वेळ मिळत नाही. जेव्हा माझ्याकडे वेळ होता त्यावेळी माझे मित्र ते त्यांच्या कामात व्यस्त होते. आता मी प्रोफेशनल कलाकार असल्यानं करार केलेल्या प्रोजेक्टबाबत काळजी घ्यावी लागते. मी लहान असताना एका शहरातून वेगळ्या शहरात जात होते तेव्हा माझ्यावर खूपच मानसिक दडपण होते.
दीपिकाच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाल्यास तिचा या वर्षी किंग खान सोबत जवान आणि पठाण नावाचा चित्रपट प्रदर्शित जाला होता. यापुढील काळात दीपिका आणि ऋतिक रोशन, अनिल कपूर यांचा बहुचर्चित असा फायटर नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.