बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या प्रत्येक अपडेट्स वर लक्ष ठेऊन बसणाऱ्या तिच्या कोट्यावधी फॅन्सना आज तिची नेहमीपेक्षाच्या शूटिंग किंवा फोटोशूटपेक्षा आगळीवेगळी पोस्ट बघायला मिळाली आहे.(INSTAGRAM)जुन्या आठवणींना उजाळा देत दीपिकाने तिची अत्यंत जुनी अशी एक आठवण तिच्या इंस्टाग्राम अकाउंटला तिने पोस्ट केलेली दिसते.'कविता लिहिण्याचा माझा पहिला आणि शेवटचा प्रयत्न!"असे शीर्षक देत एक कविता तिने तिच्या इंस्टाग्रामला टाकलेली आहे.
दीपिकाला एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून हिंदी सिनेसृष्टीत मानाचे स्थान आहे.तिने कधी कविता करावी,ती सुद्धा तिच्या शब्दात हि बाब तिच्या बाबतीत तिच्या चाहत्यांना ऐकण्यास नवीनच वाटावी अशी आहे.दीपिका फार लहान असताना शाळेत संपूर्ण वर्गाला दोन अक्षरं सांगून त्यावर पुढे कविता करायला सांगण्यात आले होते. (DEEPIKA PADUKONE)दीपिकाला मिळालेले ते दोन शब्द होते 'आय एम'(I AM ).त्यावेळी दीपिका इयत्ता सातव्या वर्गात होती. 'आय एम' या निम्म्या दोन शब्दांवरून तिने चक्क तीन कडवे लिहून ती कविता पूर्ण केली.हि कविता जरी सातव्या वर्गात लिहिली गेली असली तरी फार अर्थपूर्ण कविता आहे.कवितेत शेवटच्या कडव्यात तिने'आय ट्राय टू डू माय व्हेरी बेस्ट,आय होप आय डिझर्व व्हेरी बेस्ट' असे यमक साधत लहानपणीच तिने जणू तिच्या स्वप्नांना जिद्द आणि चिकाटीने पूर्ण करण्याचे ठरवले होते असे दिसते.त्यावेळी तिचे वय १२ वर्ष एवढे होते.
दीपिका पदुकोणला आज सगळे एक जगप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखत असले तरी तिच्या शालेय जीवनात ती एक उत्तम बॅडमिंटनपटू होती.दीपिकाचे वडील प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांच्या पावलांवर पाऊल ठेवत लहानपणी ती बॅडमिंटन खेळायची.मात्र जस जशी दीपिका मोठी होत गेली,तिला मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात आवड निर्माण झाली.वयाच्या सोळाव्या वर्षी त्यासाठी तिने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.(BOLLYWOOD)तिच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे तिने तिच्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर बॉलीवूडमध्ये तिचे वेगळे स्थान निर्माण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.