रत्नागिरी : शहरातील विद्यार्थिनी-अभिनेत्री दीप्ती वहाळकर हिची बाळूमामाच्या नावाने चांगभलं या मराठीवरील मालिकेसाठी निवड झाली आहे. या मालिकेसाठी निवडण्यात आलेली जिल्ह्यातील ती पहिली अभिनेत्री आहे. रमेश कीर कला अकादमीची ती विद्यार्थिनी. वेबमालिका तसेच एका व्यावसायिक नाटकात तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
दीप्तीची आता ''बाळूमामाच्या नावानं चांगभलं'' या लोकप्रिय मालिकेत यमुना या पात्रासाठी निवड झाली आहे. बाळूमामांच्या मुख्य भूमिकेसोबत असणारं यमुना हे पात्र मोठ्या कालावधीसाठी मालिकेत असणार आहे. सध्या गोरेगाव फिल्मसिटी मुंबई येथे या मालिकेचं शूटिंग चालू आहे. कोल्हापूर, गडहिग्लज, चंदगड, रत्नागिरी येथील प्रयोगातही तिने रसिकांची वाहवा मिळवली आहे. बाळूमामाच्या मालिकेतील या नव्या भूमिकेतही ती अभिनयाची चुणूक दाखवेल, याची खात्री आहे, असे दीप्तीला शुभेच्छा देताना विभागप्रमुख प्रदीप शिवगण म्हणाले.
ग्रामीण भागातले अनेक उमेदीचे कलाकार ज्यांना सिनेमा नाट्य आणि त्या संलग्न विभागांमध्ये आपले करिअर करायची तीव्र इच्छा असते, स्थानिक भागात ते थोडी धडपड करत असतात. त्यांचा मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग सोपा व्हावा, त्यांना त्यांच्या कलेतून उदरनिर्वाहाचा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आपली कला पोहोचण्याचा मार्ग सोपा व्हावा, यासाठी गेली ११ वर्षे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची रमेश कीर कला अकादमी सातत्याने प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षात अकादमीचे अनेक विद्यार्थी कलाकार अनेक मोठ्या प्रोडक्शन्समध्ये आपलं नाव झळकवताना दिसत आहेत. त्यामध्ये एक नवीन नाव म्हणजे कला अकादमीची विद्यार्थिनी दीप्ती वहाळकर हिचे नाव नोदवले आहे. दीप्तीचे शिल्पाताई पटवर्धन यानी विशेष कौतुक केले.
कोकणातल्या झाकण्या''
रमेश कीर कला अकादमीच्या अनेक नाटकांमध्ये दीप्तीने दमदार अभिनयाने ओळख पटवून दिली आहे; पण महाराष्ट्रभर गाजलेल्या ''कोकणातल्या झाकण्या'' या वेबमालिकेतील ती लोकप्रिय अभिनेत्रीही आहे. सोबत ''भयंकर आनंदाचा दिवस'' हे तिचे व्यावसायिक नाटक सध्या सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.