Demon Slayer To The Hashira Training Box Office : 22 फेब्रुवारी रोजी डीमन स्लेयर या अॅनिमे शोचा नवीन एपिसोड 'टू दि हाशिरा ट्रेनिंग' भारतातील सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला. शुक्रवारी रिलीज झालेल्या हिंदी-मराठी चित्रपटांच्या गर्दीतही हा जपानी अॅनिमे शो टिकून राहिला आहे. पहिल्या चार दिवसांमध्ये तब्बल 3.55 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
डीमन स्लेयर (Kimetsu No Yaiba) ही एक जपानी अॅनिमे सीरीज आहे. आपल्या नव्या सीझनचा पहिला एपिसोड मूव्ही स्वरुपात रिलीज करण्याची पद्धत या अॅनिमेने मागील सीझनपासून सुरू केली होती. या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आल्यानंतर आता चौथ्या सीझनचा पहिला एपिसोडही भारतीय सिनेमागृहांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. जपानी (English Subbed) आणि इंग्रजी डब अशा दोन भाषांमध्ये हा मूव्ही उपलब्ध आहे.
सॅकनिकने दिलेल्या अहवालानुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी Demon Slayer ने 60 लाख रुपये कमाई केली होती. यानंतर शुक्रवारी 1 कोटी, शनिवारी 90 लाख आणि रविवारी 1.04 कोटी एवढी कमाई या चित्रपटाने केली आहे. यातील बहुतांश वाटा हा जपानी भाषेत रिलीज केलेल्या चित्रपटाचा आहे हे विशेष.
नव्या सीझनचा पहिला एपिसोड असल्यामुळे या सिनेमाला आधीच लिमिटेड ऑडियन्स आहे. ज्यांनी डीमन स्लेयर ही सीरीज पाहिली आहे, त्यांच्यासाठीच हा चित्रपट असणार आहे. शिवाय गेल्या आठवड्यात कित्येक मराठी आणि हिंदी चित्रपट देखील रिलीज झाले आहेत. या सगळ्यात देखील डीमन स्लेयरने केलेली कमाई नक्कीच मोठी आहे. To The Hashira Training Arc क्रंचीरोलवर कधी रिलीज होणार आहे याबाबत कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
Demon Slayer To The Hashira Training हा सिनेमा या आठवड्यात देखील सिनेमागृहांमध्ये असणार आहे. पीव्हीआर (PVR), सिटीप्राईड (City Pride), सिनेपोलिस (Cinepolis) अशा मुख्य थिएटर चेन्समध्ये हा सिनेमा उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.