‘ठाण्याचा वाघ’ म्हणून ख्याती असलेले धर्मवीरआनंद दिघे(Dharmaveer Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारलेला 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (Dharmaveer) हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत ‘माईलस्टोन’ ठरतोय. प्रेक्षकांनी या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला. चित्रपटाला मिळालेल्या या प्रचंड प्रतिसादाची यशोगाथा रविवार १९ जूनला दुपारी १२.०० वा. व सायं. ६.०० वा. झी टॉकीजवर उलगडली जाणार आहे. चित्रपटाला मिळालेले तुफान यश साजरं करीत या अभूतपूर्व यशाला सलाम करण्याकरिता 'धर्मवीर’ चित्रपटाची यशोगाथा तयार करण्यात आली आहे. या यशोगाथेमध्ये चित्रपटाच्या टीमने चित्रपटाचा आतापर्यंतचा प्रवास व अनुभव कथन केले आहेत. या यशोगाथेमध्ये कलाकार, तंत्रज्ञ यांचे अनुभव, पडद्यामागचे किस्से यांचा समावेश आहे.('Dharmaveer' On Tv Channel; time,date inside details)
'धर्मवीर' चित्रपटासाठी केलेली अपार मेहनत व हा चित्रपट कारकिर्दीला कसा नवं वळण देणारा ठरला हे यशोगाथेतून सांगताना, मराठी चित्रपटांच्या यशाचा मापदंड म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जाईल असं अभिनेता प्रसाद ओक आवर्जून नमूद करतात. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेला हा लोकनेता सर्वसामान्यांच्या मनात आजही जिवंत आहे, मला आणि माझ्या भूमिकेला मिळलेलं प्रेम त्याचीच पोचपावती असल्याचं ही ते सांगतात.
‘धर्मवीर’ आनंद दिघे यांचा एवढा मोठा जीवनप्रवास एका चित्रपटातून मांडणं खूप अवघड काम, पण हा सगळा घाट मी घातला आणि या कलाकृतीच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचं काम झी स्टुडिओजने केल्याने हे शिवधनुष्य पेलल्याचे निर्माते मंगेश देसाई सांगतात. राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री मा. एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आणि मोलाचे सहकार्य या चित्रपटाला लाभले.
संगीताच्या माध्यमातून तो काळ आणि एवढया लोकप्रिय व्यक्तिमत्वाचा पट उलगडण्यासाठी संगीतकार म्हणून अविनाश-विश्वजीत, चिनार-महेश आणि नंदेश उमप यांनी संगीताची बाजू भक्कमपणे सांभाळली. रविवार १९ जूनला दुपारी १२.०० वा. व सायं. ६.०० वा. ‘धर्मवीर’ चित्रपटाची यशोगाथा झी टॉकीजवर अवश्य पहा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.