Only on person in theatre to watched Marathi Movie 'Dharmaveer'? What Happened? Isntagram
मनोरंजन

'धर्मवीर' चा शो पहायला सिनेमागृहात फक्त एकच माणूस? प्रसाद ओकची पोस्ट चर्चेत

'धर्मवीर' सिनेमाची बॉक्सऑफिसवर उत्तम घोडदौड सुरू असताना प्रसाद ओकच्या 'त्या' पोस्टनं गोंधळ उडवला .

प्रणाली मोरे

प्रवीण तरडे(Pravin Tarde) दिग्दर्शित 'धर्मवीर'(Dharmaveeer) सिनेमानं प्रदर्शना आधी पासूनच चर्चेत रहायला सुरुवात केली होती. प्रदर्शानंतर धर्मवीर आनंद दिघेंचं(Anand Dighe) जीवनचरित्र(Biopic) पडद्यावर पाहण्यासाठी सिनेमागृहातही प्रेक्षकांनी गर्दी केली. आज बॉक्सऑफिसवर सिनेमाची घोडदौड उत्तम सुरू आहे. अनेक हिंदी सिनेमांनाही 'धर्मवीर'नं पाणी पाजलेलं आपण पाहिलं असेल. या सिनेमाची कथा,सिनेमात आनंद दिघे यांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक याच्यावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. पण असं असताना अचानक 'धर्मवीर' सिनेमाची गर्दी ओसरली असे संकेत देणारी पोस्ट स्वतः प्रसाद ओकनं पोस्ट केली अन् चाहते चिंतेत पडले. पण या पोस्टमागची खरी गोष्ट जाणून घेण्यासाठी पूर्ण बातमी वाचायला आणि प्रसाद ओकने(Prasad Oak) पोस्ट(Latest Post) केलेला व्हिडीओ(Video) पूर्ण पहायला हवा बरं का.

प्रसाद ओकनं सोशल मीडियावर(Social Media) आपल्या 'धर्मवीर' सिनेमासंदर्भात एक पोस्ट केली अनं केवळ पोस्टचं कॅप्शन वाचून चाहते टेन्शनमध्ये आले. पण प्रसादनं पोस्टसोबत एक व्हिडीओ पोस्ट करून तो शेवट पर्यंत पहायला सांगितल्यानं काहीसा जीव भांड्यात पडला. प्रसाद ओकनं एक व्हिडीओ पोस्ट करीत त्याला कॅप्शन दिलं होतं की,"धर्मवीर" चा show पहायला सिनेमागृहात "फक्त एकच माणूस"?????
मराठी कलाकाराच्या बाबतीत किंवा मराठी सिनेमासृष्टीत
हे कदाचित पहिल्यांदाच घडत असावं…!!!
याचं कारण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच कळेल...!!!
आचार्य श्री धर्मराज गुरुजी...
तुमचे आभार कसे मानू
तेच कळत नाहीये गुरुजी...
असंच प्रेम...असाच आशीर्वाद कायम असुद्या हीच नम्र विनंती...

प्रसाद ओकनं पोस्ट केलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येक सिने-प्रेमीला,मराठी चाहत्याला मात्र धर्मवीर कलाकृतीचा अभिमान वाटल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. पण कोण आहेत 'आचार्य धर्मवीर गुरुजी' आणि काय म्हणणं आहे त्यांचे हे जाणून घेण्यासाठी बातमीत जोडलेल्या व्हिडीओ पोस्टची लिंक नक्की पहा.

भारतातील सुप्रसिद्ध ज्योतिषी,रत्नशास्त्रज्ञ, वास्तुशास्त्रज्ञ याबरोबरच आजच्या युवापिढीचे प्रेरणास्थान असलेले आचार्य श्री धर्मराज गुरुजी (Acharya shri. Dharmraj guruji)यांनी 'धर्मराज'(Dharmaraj) सिनेमा शांतपणे पहाता यावा यासाठी संपू्र्ण थिएटर बूक केलं होतं. प्रसाद ओक एक अभिनेता म्हणून आपल्याला आवडतो म्हणूनच त्यानं अभिनय केलेला एका चांगल्या विषयावरचा सिनेमा कोणत्याही गोंधळाशिवाय पहाता यावा यासाठी आपण संपूर्ण थिएटर बूक केल्याचं 'आचार्य धर्मराज गुरुजीं'नी म्हटलं आहे. प्रसादनं त्यांच्या 'धर्मराज फाऊंडेशन'च्या एका उपक्रमाच्या ध्वनीफितीला आवाज दिला होता तेव्हापासून आपण त्याच्या आवाजाचेही जबरदस्त चाहते आहोत असं आचार्यजी म्हणाले आहेत. थिएटरमध्ये एकटं बसून 'धर्मराज' सिनेमा पहाण्याचा आनंद घेताना दिसणारे आचार्य धर्मराज गुरुजी यांचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी 'धर्मराज' सिनेमाविषयी आणि प्रसाद ओक विषयीही आपली उत्स्फुर्त प्रतिक्रिया नोंदवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर मोठी घटना! सुमारे 40-50 फूट खोलवर लागली आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT