Dharmendra apologises to Hema Malini, Esha and Ahana Deol for not inviting them to Karan Deol’s wedding  SAKAL
मनोरंजन

Dharmendra Apologises: सर्वांचा आदर पण.. नातवाच्या लग्नानंतर धर्मेंद्रने मागितली हेमा - ईशाची माफी, पोस्ट व्हायरल

धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. त्यात त्यांनी हेमा मालिनी आणि मुली इशा आणि आहाना यांची माफी मागितलीय

Devendra Jadhav

Dharmendra Apologises News: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अलीकडेच सनी देओलचा मुलगा करण देओलच्या लग्नात धर्मेंद्र नाचताना दिसले. पण आता मात्र धर्मेंद्र यांचा सध्या इमोशनल अंदाज पाहायला मिळतोय.

धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. त्यात त्यांनी हेमा मालिनी आणि मुली इशा आणि आहाना यांची माफी मागितलीय. काय म्हणाले आहेत धर्मेंद्र बघूया..

(Dharmendra apologises to Hema Malini, Esha and Ahana Deol for not inviting them to Karan Deol’s wedding)

धर्मेंद्र लिहितात... 'ईशा, आहाना, हेमा आणि माझी सर्व प्रिय मुले... तख्तानी आणि वोहरा कुटुंबे मला आवडतात आणि तुम्हा सर्वांचा मनापासून आदर करतो... वय आणि आजारपण माझ्यासोबत वाढत आहे. मी तुमच्याशी वैयक्तिक बोलू शकेन, पण...'

अशी पोस्ट लिहून धर्मेंद्र यांनी दोन हात जोडणारे ईमोजी जोडले आहेत. अशा परिस्थितीत धर्मेंद्र यांना त्यांच्या कुटुंबियांना काय सांगायचे होते, पण सांगता आले नाही, असा विचार करायला हवा. धर्मेंद्रची इन्स्टाग्राम पोस्ट झपाट्याने व्हायरल झाली.

यापूर्वीही धर्मेंद्रने अशा काही दु:खद पोस्ट शेअर केल्या होत्या की चाहत्यांची मनं भरून आली होती.

आता धर्मेंद्र यांनी पत्नी हेमा आणि मुली ईशा, आहाना यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. धर्मेंद्र यांचा हा अंदाज त्यांच्या चाहत्यांना काहीसा नवा आहे.

ही पोस्ट पाहिल्यानंतर धर्मेंद्र यांचे फॅन्स नाराज झाले आहेत. त्यांनी या पोस्टमध्ये आरोग्य आणि आजाराविषयी सांगितले आहे.

धर्मेद्र यांना काहीतरी बोलायचे आहे पण नेमके काय ते कळू शकत नाही. धर्मेंद्र आपले मन पूर्णपणे व्यक्त करू शकला नाही.

या अर्धवट बोलण्यामुळे लोक अंदाज बांधू लागले आहेत. चाहते धर्मेंद्रच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत आणि पोस्टवर कमेंट करून त्यांना काय झाले आहे असे सतत विचारत आहेत.

याआधीही धर्मेंद्रने अशाच दोन पोस्ट टाकल्या होत्या, ज्यानंतर चाहते नाराज झाले होते. जगण्या-मरण्याचं बोलण्याचं कारण काय, असे प्रश्न चाहते सतत विचारत आहेत. 1960 मध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरवात केलेल्या धर्मेंद्र यांनी तब्बल तीन दशकं बॉलीवूडवर राज्य केलं.

धर्मेंद्र वयाच्या 87 व्या वर्षी देखील फिट आहेत आणि सक्रिय देखील आहेत. पण सध्या धर्मेंद्रचा हा भावनिक अंदाज फॅन्सना नवीन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT