Dharmendra Google
मनोरंजन

बॉलीवूडच्या वीरूनं ट्रोलरला केलं क्लीन बोल्ड

प्रणाली मोरे

वय वर्षे ८६,पण तरुणांनाही लाजवेल असा उत्साह कोणामध्ये पहायला मिळत असेल तर ते बॉलीवूडचे वीरू धर्मेंद्र(Dharmendra) यांच्यामध्ये. आजही ते अनेक रिअॅलिटा शो मधनं पाहुणे परिक्षक म्हणून उपस्थित राहताना दिसतात. शुटिंग करताना तासन तास बसतात,स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस एन्जॉय करताना दिसतात. नाहीतर आताचे तिशी-चाळीशीतल्या परिक्षकांचे जर नखरे पाहिले तर डोक्याला तापच म्हणावा लागेल तो. असो,आपण बोलतोय द ग्रेट धर्मेंद्र यांच्याबद्दल. धर्मेंद्र यांनी ट्विटरवर(Twitter) सुभाषचंद्र बोस(Subhashchandra Bose) यांच्याशी संबंधित एक पोस्ट केली होती. या ट्विटवर त्यांच्या चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्मेंद्रही यातील अनेक चाहत्यांना रिप्लाय देत होते.

धर्मेंद्र (Dharmendra)सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात, ते आपण पाहिलंच असेल. ते त्यांच्या अकाऊंटवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं अगदी मजेशीरपणे देत असतात. काही दिवसांपुर्वी सलमान खानविषयी (salman khan) एका नेटकऱ्याने धर्मेंद्र यांना एक प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी मिश्कीलपणे उत्तर दिलं होतं. नुकतेच एका ट्रोलरने धर्मेंद्र यांना सुभाषचंद्र बोस यांच्या पोस्टवरून ट्रोल करीत सरळ म्हटलं, 'आप पागल तो नहीं हो गए'... यावर धर्मेंद्र यांनी “पागलपन से ही जिंदगी में इंकलाब आता है.” असं उत्तर दिल्याने त्याची चर्चा झाली होती. आता अशा ट्रोलर्सना गप्प करायाला धर्मेंद्रजींसारखं हजरजबाबी असायलाच हवं. मान गए पाजी...

धर्मेंद्र सध्या करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात काम करत आहेत. या सिनेमाचे शूटिंग दिल्लीत अनेक दिवस चालले होते. या सिनेमात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमातून अनेक वर्षांनी करण जोहर दिग्दर्शनाचा आनंद घेत आहे. या सिनेमातील एक महत्त्वाचं गाणं अद्याप शूट करायचं राहिलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे करणने ते शुटिंग पुढे ढकलल्याचं बोललं जातंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dasara Melava Rally: प्रचार तोफांची आज पहिली सलामी; जाणून घ्या कोणत्या नेत्याचा कुठं होणार दसरा मेळावा

Bagmati Express Accident: मोठा रेल्वे अपघात! वेग 75 किमी, बागमती एक्स्प्रेस मुख्य मार्गाऐवजी लूप लाइनमध्ये घुसली; 19 प्रवासी जखमी

Dussehra Melava 2024 Live Updates: विजयादशमीनिमित्त माँ कामाख्या देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

अग्रलेख : अपने अपने रावण!

Dussehra 2024 Wishes: 'वाईटावर चांगल्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय..' दसऱ्याच्या प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT