अभिनेते धर्मेंद्र Dharmendra यांच्या पत्नी आणि सनी देओलच्या आई प्रकाश कौर Prakash Kaur या फार क्वचित कॅमेरासमोर येतात. सनी आणि बॉबी देओल यांच्यासोबतचे त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर पहायला मिळतील. मात्र त्यांचा व्हिडीओ कधीच पहायला मिळाला नव्हता. नुकतंच सनी देओलने Sunny Deol सोशल मीडियावर आईसोबतचा खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघंही बर्फात खेळताना पहायला मिळत आहेत. आईसोबतचा हा व्हिडीओ पोस्ट करत सनी देओलने भावनिक कॅप्शन दिलं आहे.
'आपण कितीही मोठे झालो तरी त्यांच्यासाठी मात्र लहान मूलच राहणार. आईवडिलांचं प्रेमच खरं आणि अमूल्य प्रेम आहे. त्यांच्या प्रेमाचं मूल्य जपा. हे क्षण माझ्या अविस्मरणीय क्षणांपैकी एक आहेत. या क्षणांमध्ये मी माझ्या आईसोबत माझं बालपण पुन्हा एकदा अनुभवतोय,' असं कॅप्शन सनी देओलने या व्हिडीओला दिलं आहे. आईसोबत सनी देओल परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेला होता. तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. आईच्या वाढदिवशीसुद्धा त्याने काही फोटो पोस्ट केले होते.
धर्मेंद्र यांनी पंजाबमध्ये प्रकाश कौर यांच्याशी लग्न केलं होतं. त्यावेळी धर्मेंद्र यांचं वय केवळ १९ वर्षे होतं. १९५४ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर धर्मेंद्र हे बॉलिवूडमध्ये काम करू लागले. अभिनयक्षेत्रात काम करताना त्यांची हेमा मालिनी यांच्याशी भेट झाली. हेमा मालिनी यांना पाहताच क्षणी ते त्यांच्या प्रेमात पडले होते.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाचे वृत्त ऐकल्यानंतरही प्रकाश कौर या खचल्या नव्हत्या. धर्मेंद्र हे माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे, अशा शब्दांत त्यांनी एका मुलाखतीत भावना व्यक्त केल्या होत्या. "ते कदाचित खूप चांगले पती नाहीत, पण माझ्यासाठी ती खूप चांगली व्यक्ती आहे, त्यांच्या मुलांसाठी ते खूप चांगले वडील आहेत. त्यांच्या मुलांचंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे", असं त्या म्हणाल्या होत्या.
धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांना चार मुलं आहेत. सनी देओली, बॉबी देओल ही दोन मुलं आणि अजेता आणि विजेता या दोन मुली आहेत. प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं होतं. यासाठी धर्मेंद्र यांनी धर्मांतर करून हेमा मालिनी यांच्याशी लग्नगाठ बांधली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.