dharmveer movie last scene gets viral about anand dighe death reason  sakal
मनोरंजन

'आनंद दिघे तर बरे होते मग अचानक गेले कसे?.. 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल..

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून धर्मवीर चित्रपटातील एक सीन व्हायरल झाला आहे.

नीलेश अडसूळ

Maharashtra Politics : शिवसेनेत सुरू असलेलं बंडाचं राजकारण कोणत्या दिशेला जाईल याचा कुणालाही भरोसा राहिलेला नाही. शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) गुवाहाटीला रवाना झाल्याने महाविकास आघाडी सरकार डळमळीत झाले आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे यांना पाठींबा मिळत असला तरी कार्यकर्ते मात्र सेनेच्या बाजूने ठामपणे उभे आहेत. पण शिंदे यांच्या या भूमिकेवर एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले होते. त्या ट्विट नंतर नव्या चर्चाना उधान आले आहे. शिवाय धर्मवीर (dharmveer marathi movie) चित्रपटातील एक सीनही कालपसून व्हायरल होत आहे . (dharmveer movie last scene gets viral about anand dighe death reason)

या ट्विट मध्ये नारायण राणे (narayan rane tweet on eknath shinde) म्हणाले होते, 'शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता,' असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर आनंद दिघे यांच्या मृत्यूबद्दल बोललं जात आहे. त्यांच्या मृत्यूचं कारण नेमकं काय? यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्यासोबतच आनंद दिघे यांच्या मृत्यू विषयी भाष्य करणारा चित्रपटातील एक सीन ही व्हायरल होत आहे. (anand dighe death reason)

चित्रपटात शेवटच्या सीनमध्ये आनंद दिघे यांच्या निधनानंतर एक व्यक्ती रडणाऱ्या कार्यकर्त्याला विचारते, 'दिघे कशामुळे गेले?' यावर तो कार्यकर्ता 'हार्ट अटॅक ने गेले' असं सांगतो. यावर तो व्यक्ती म्हणतो, 'कुणी सांगितलं' त्यावर कार्यकर्ता म्हणतो 'डॉक्टरांनी'. मग तो व्यक्ती त्या कार्यकर्त्याला म्हणतो, 'तुम्ही रिपोर्ट पाहिले का?' सात वाजेपर्यंत साहेब बरे होते आणि अचानक गेले' आणि एका प्रश्नार्थक नजरेने तो कार्यकर्त्याकडे पाहतो. कालपासून हा सीन प्रचंड व्हायरल होत आहे. शिवाय आनंद दिघे यांचा मृत्यू, एकनाथ शिंदे यांची आताची भूमिका याचाही संबंध जोडला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

Bandra East Assembly Constituency Results: 'मातोश्री'च्या अंगणात पुन्हा शिवसेना? वरुण सरदेसाई यांनी मारली मुसंडी; झिशान सिद्दीकी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT