Dia Mirza Instagram
मनोरंजन

Dia Mirza: बॉलीवूडमध्ये सौंदर्य वरदान नाही शाप ठरलं दिया मिर्झासाठी..खुलासा करत अभिनेत्रीनं उडवली खळबळ..

दिया मिर्झा सध्या अनुभव सिन्हाच्या 'भीड' सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे.

प्रणाली मोरे

Dia Mirza: बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री म्हणून काम करण्यासाठी जे काही ठराविक नियम लागू केलेयत त्यावरनं नेहमीच चर्चेचे फड रंगतात. काही जणांचे म्हणणे आहे की अभिनेत्री बनण्यासाठी जे नियम लागू केलेयत त्यावरनंच त्यांची निवड केली जाते.. म्हणजे जसं की त्यांचा गोरा रंग, दिसायला सुंदर,अंगकाठी सडपातळ आणि उंच बांधा वगैरे..वगैरे.

काही अभिनेत्रींनी ही गोष्ट मान्य देखील केलीय की अनेकदा त्या मोजमापात आपण न बसल्यामुळे आपल्या हातातनं सिनेमे निघून गेले होते. पण दिया मिर्झानं केलेलं वक्तव्य मात्र इंडस्ट्रीची दुसरी बाजू दाखवतं. (Dia Mirza reveals she faced rejection for being so beautiful)

आज तक सोबत केलेल्या खास बातचीती दरम्यान दीयानं सांगितलं की गेल्या २० वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय असूनही इंडस्ट्रीत मी महिलांसंबंधित केले जाणारे अनेक प्रकारचे भेदभाव सहन केले आहेत.

अनेकदा आपल्याला एका विशिष्ट पठडीतल्याच भूमिका दिल्या जातात..त्या पलिकडे काही करायचा विचार केला तर समोरनं मात्र नकार पचवायला लागतो असं सांगत दियानं मोठी खळबळ उडवून दिली आहे.

ती म्हणाली आहे.,''माझं सुंदर दिसणं मला इंडस्ट्रीत आल्यावर शाप ठरत आहे''.

आता हे कसं शक्य आहे हा प्रश्न पडला असेलच आपल्याला. तेव्हा चला यासंबंधित नेमकं दिया काय म्हणालीय ते जाणून घेऊया.

दियानं यावर सविस्तर बोलत म्हटलं आहे की,''मी नेहमीच अशा दिग्दर्शकांसोबत काम करण्यास उत्सुक होते ज्यांचा सिनेमा गंभीर धाटणीचा असतो. अशा अनेकांनी मला त्यांच्या सिनेमाचा भाग नाही बनवलं ते माझ्या लूकमुळे''.

'' फिल्ममेकर्स माझ्या तोंडावर म्हणतात की,''तुला काम मिळणार नाही कारण तू खूप सुंदर आहे..आणि मग पदरी रीजेक्शन येतं. आता असं नाही की मी माझ्या दिसण्यावर खूश नाही किंवा मला स्वतःला मी आवडत नाही. पण ही गोष्ट मात्र खरी आहे की कलाकारांना त्यांच्या लूकवरनं जज केलं जातं. आणि ही एका कलाकारासाठी चांगली गोष्ट नाही''.

हेही वाचा: देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

मला दिग्दर्शक 'टू मेनस्ट्रीम लूक' म्हणत चांगले सिनेमे ऑफर करत नाहीत. मी खूप सुंदर दिसते म्हणून माझ्या हातातून असे कितीतरी सिनेमे गेले आहेत.

दिया पुढे म्हणाली,''जेव्हा पण मी असं बोलते तेव्हा लोकांना वाटतं मी गर्वानं हे बोलत आहे. पण त्यांना माहीत नाही की हीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी शोकांतिका आहे''.

दिया मिर्झा सध्या अनुभव सिन्हाच्या 'भीड' सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. हा सिनेमा लॉकडाऊनवर आधारित आहे. यामध्ये तिनं एका आईची भूमिका केली आहे जी लॉकडाऊनमध्ये हॉस्टेलमधील आपल्या मुलीला घरी घेऊन येण्यासाठी बाहेर पडते.

सिनेमात दियासोबत राजकुमार राव,भूमी पेडणेकर,पंकज कपूर,कृतिका कामरा,आशुतोष राण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. २४ मार्चला हा सिनेमा सिनेमागृहात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT